जी.डी.सी. ॲण्ड ए. बोर्ड मार्फत दि. २४, २५ आणि २६ मे २०२४ रोजी घेण्यात येणाऱ्या जी.डी.सी. ॲण्ड ए. परीक्षेसाठी पदवीधर उमेदवारांकडून दि. १५ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
परीक्षेचे नाव – जी.डी.सी. ॲण्ड ए. बोर्ड
पात्रता – उमेदवार पदवीधर असावा किंवा सहकार खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती अथवा कोणत्याही एका सहकारी संस्थेत कनिष्ठ लिपिक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या पदावरील कामाचा १० वी उत्तीर्ण असल्यास ५ वर्षे आणि १२ वी उत्तीर्ण असल्यास ३ वर्षांचा अनुभव असावा. तसेच तो संबंधित संस्थेत कार्यरत असून कायम होण्याची शक्यता असली पाहिजे. अशा उमेदवारांनी संबंधित अधिकाऱ्याचा मूळ दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक.
परीक्षा फी – जी.डी.सी. ॲण्ड ए. साठी परीक्षा फी ₹८०० तर सहकारी गृहनिर्माण प्रमाणपत्र परीक्षेसाठी ₹५००₹५०० असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावी याशिवाय उमेदवार चलनाद्वारे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरु शकतात.
चलनाद्वारे परीक्षा फी भरावयाची असल्यास लेख्यांचे वर्गीकरण विभाग – ०४२५ को ऑॉमरेशन, प्रधान शीर्ष – ८०० – अदर रिसिटस्, उपप्रधान शीर्ष- (ix) एक्झामिनेशन फी, संगणक संकेतांक – (०४२५०१२५)
परीक्षा पद्धत – उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. उमेदवारांना परीक्षा मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून देता येईल मात्र, अर्जात तसे नमूद करणे आवश्यक. प्रत्येक पेपर १०० गुणांचा असेल. उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पेपर मध्ये किमान ५० गुण मिळविणे आवश्यक.
प्रवेशपत्र – उमेदवारांना परीक्षेचे ठिकाण व आसन क्रमांक प्रवेशपत्रद्वारे कळविला जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र परीक्षेच्या आधी ८ दिवस वेबसाईट वरुन डाउनलोड करुन घ्यावे. त्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरतेवेळी प्राप्त झालेला युजर नेम व पासवर्डचा वापर करावा लागेल.
– परीक्षेचे वेळापत्रक –
• दिनांक – २४/०५/२०२४ वेळ – सकाळी १०.०० ते १.०० पर्यंत. विषय क्रमांक – १ – मॅनेजमेंट ऑफ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी
• दिनांक – २४/०५/२०२४, वेळ – दुपारी २.०० ते ५.००/पर्यंत विषय क्रमांक – २ अर्कोट्स
• दिनांक – २५/०५/२०२४, वेळ – सकाळी १०.०० ते १.०० पर्यंत विषय क्रमांक ३ – ऑडिटिंग
• दिनांक – २५/०५/२०२४, वेळ – दुपारी २.०० ते ५.०० पर्यंत. विषय क्रमांक – ४ हिस्ट्री, प्रिन्सिपल्स् ॲण्ड मॅनेजमेंट इन को-ऑपरेशन
• दिनांक – २६/०५/२०२४, वेळ – सकाळी १०.०० ते १.०० पर्यंत. विषय क्रमांक ५ को-ऑपरेटिव्ह लॉज् ॲण्ड अदर लॉज्
● दिनांक – २६/०५/२०२४, वेळ – दुपारी २.०० ते ५.०० पर्यंत. विषय क्रमांक – ६- को-ऑपरेटिव्ह बँकिंग ॲण्ड क्रेडिट सोसायटीज्
परीक्षा केंद्रे सांकेतांक – १) कोल्हापूर (१४), २) सांगली (१३), ३) सातारा (१२), ४) पुणे (१०), ५) सोलापूर (११), ६) मुंबई (०१), ७) ठाणे (०२). ८) नाशिक (०६), ९)जळगाव (०८), १०) अहमदनगर (०९), ११) औरंगाबाद (१५), १२) लातूर (२१), १३) अकोला (२३), १४) अमरावती (२४), १५) नागपूर (२७), १६) चंद्रपूर (२९)
प्रमाणपत्राबाबत – जी.डी.सी ॲण्ड ए परिक्षेचे सर्व सहा विषय उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींना “सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन (सी.एच.एम.) सह शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए.) परीक्षेचे प्रमाणपत्र आणि “जी.डी.सी. ॲण्ड ए” परीक्षेचे गुणपत्रक देण्यात येईल. सी.एच.एम. परीक्षेचे सर्व तीन विषय उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींना “सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन (सी.एच.एम.) ” परीक्षेचे प्रमाणपत्र आणि “सी.एच.एम.” परीक्षेचे जी.डी.सी. ॲण्ड ए. परीक्षेच्या सहा विषयापैकी पहिले तीन विषय (विषय क्रं १ – मॅनेजमेंट ऑफ को. ऑप. हाऊसिंग सोसायटीज, विषय क्रं २ – अकौंटस आणि विषय क्रं ३ – ऑडिटींग ) उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींना “सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन (सी.एच.एम.) ” प्रमाणपत्रासह “जी. डी. सी. ॲण्ड ए.” परीक्षेचे गुणपत्रक देण्यात येईल.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रियापूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन दि. १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत. या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. अर्जातील सर्व माहिती भरावी आणि परीक्षा केंद्र निवडावे. एकदा निवडलेले परीक्षा केंद्र बदलता येणार नाही. ऑनलाईन अर्जात फोटो, सही व आवश्यक प्रमाणपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी किंवा परीक्षा फी चलनाची प्रिंटाऊट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. यानंतर ऑनलाईन अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करावा. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट किंवा कागदपत्रे कोणत्याही कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पासपोर्ट साईजचा अलीकडील काळातील फोटो २) स्वाक्षरी ३) पदवीधर असल्यास मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र ४) माध्यमिक बोर्डाचे १० वी चे प्रमाणपत्र व गुणपत्र (बिगर पदवीधर, १० वी पास असल्यास) ५) उच्च माध्यमिक बोर्डाचे १२ वी चे प्रमाणपत्र व गुणपत्र (बिगर- पदवीधर, १२ वी पास असल्यास) ६) परीक्षा फी चलनाद्वारे भरली असल्यास चलनाची प्रत ७) जी.डी.सी. अॅण्ड ए. परीक्षेत तसेच सी. एच. एम. परीक्षेत कोणत्याही विषयामध्ये ५० गुण प्राप्त झाले असल्यास सूट मागता येईल. यासाठी जी.डी.सी. अॅण्ड ए. परीक्षेचे तसेच सी. एच. एम. परीक्षेचे मागील गुणपत्रक ८) अनुभवाचा दाखला – संस्थेचा लेटरहेड वरील योग्य त्या प्राधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिलेला अनुभवाचा दाखला. यामध्ये परीक्षार्थीचे नाव, पद, वेतनश्रेणी, जन्मदिनांक, पदस्थापना दिनांक, एस.एस.सी/ एच. एस. सी उत्तीर्ण दिनांक, सेवेमध्ये कायम होण्याची शक्यता आहे/ नाही, संस्थेमध्ये सध्या कार्यरत आहे/ नाही या बाबींचा समावेश असावा. ९) कायम करणार असल्याचे हमीपत्र (परिक्षार्थी सेवेमध्ये कायम नसल्यास) – संस्थेच्या लेटरहेड वरील योग्य त्या प्राधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिलेले हमीपत्र १०) महिलांसाठी – नावात बदल असल्यास विवाहित महिला परीक्षार्थीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र /राजपत्र/प्रतिज्ञापत्र.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. १५ फेब्रुवारी २०२४