( Border Security Force )
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स : सब इन्सपेक्टर, ज्युनिअर इंजि. इ. पदांसाठी इंजि डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक १५ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नांव – सब इन्स्पेक्टर (वर्क) ग्रुप बी.
पदसंख्या – १३ (ओपन ७, ओबीसी २, अजा (३,अज १) पैकी माजी सैनिक १
पात्रता – उमेदवार ३ वर्षाचा इंजि. डिप्लोमा (सिव्हील) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
२) पदाचे नांव – ज्युनिअर इंजिनिअर्स/सब इन्स्पेक्टर (इलेक्ट्रीकल) ग्रुप बी.
पदसंख्या – ९ (ओपन ५, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अज १) पैकी माजी सैनिक १
पात्रता – उमेदवार इंजि. डिप्लोमा (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
वयोमर्यादा – दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे: वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे, ओपन शासकीय कर्मचारी ५ वर्षे, ओबीसी शासकीय कर्मचारी ८ वर्षे, तर अजा/अज शासकीय कर्मचाऱ्यांना १० वर्षे सवलत तर माजी सैनिकांना वयामध्ये नियमाप्रमाणे सवलत.
शारीरिक पात्रता – पुरुष : उंची कमीत कमी १६५ सें.मी. (डोंगराळ व आदीवासी भागातील उमेदवारांना उंचीत ५ सेमी सवलत) व छाती ७६-८१ सें.मी. (२० वर्षाच्या आतील उमेदवारांना २ सेंमी सवलत). वजन उंचीच्या प्रमाणात असावे. महिला – उंची कमीत कमी १५७ सें.मी. इतकी असावी. वजन कमीत कमी ४६ किलो असावे. तसेच उंचीच्या प्रमाणात असावे. दृष्टी जवळील दृष्टी चांगला डोळा N6, खराब डोळा N9, दूरची दृष्टी – चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/९. उमेदवारांचे गुडघे एकमेकास टेकलेले नसावे. सपाट तळवे, तिरळेपणा, रंगांधळेपणा असेल तर अशा उमेदवारांनी अर्ज करू नयेत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ व २ साठी ₹ ९३००-३४८००+ग्रेड पे ₹४२०० असे वेतन अदा केले जाईल. वेतनश्रेणी शिवाय उमेदवारांना सर्वसोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) अपंग उमेदवारांनी अर्ज करु नयेत. ३) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव इ. दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजीचे धरले जाईल ४) एकुण पदसंख्ये पैकी १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परिक्षा, कागदपत्रे तपासणी, शारिरीक पात्रता चाचणी, शारीरीक क्षमता चाचणी, प्रात्यक्षिक परीक्षा, मुलाखत व वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा दोन पेपर मध्ये घेतली जाईल. पहिला पेपर हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचा असून १०० गुणांचा व दीड तास कालावधीचा असेल. यामध्ये सामान्य बुध्दीमत्ता (२५ प्रश्न, २५ गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न,२५ गुण), संबंधीत विषयाचे ज्ञान (५० प्रश्न, ५० गुण) यावर आधारित प्रश्न विचारले जातील. तसेच पेपर २ हा वर्णनात्मक स्वरुपाचा आणि १०० गुणांचा असेल. यामध्ये संबंधीत विषयाच्या ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेतील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांचे शारीरीक पात्रता चाचणी घेतली जाईल. यामध्ये मध्ये उंची, छाती व वजन यांच्ये मोजमाप केले जाईल. शारीरिक पात्रता चाचणी मधील पात्र उमेदवारांची शारीरीक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये पुरूष उमेदवारांसाठी १.६ कि.मी धाव ७ मिनीटात पूर्ण करणे तसेच लांब उडी – ११ फुट (३ संधी), उंच उडी – ३.५ फुट (३ संधी) . तर महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर धाव ५ मिनीटात पूर्ण करणे . तसेच लांब उडी – ८ फुट (३ संधी), उंच उडी – २.५ फुट (३ संधी) या चाचण्या घेतल्या जातील माजी सैनिकांसाठी शारिरीक पात्रता व क्षमता चाचणी घेतली जाणार नाही. यामधीलपात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रॅक्टकिल टेस्टसाठी बोलाविले जाईल. त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांना निवडीबाबत नंतर कळविण्यात येईल.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ड्रायव्हींग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
सेंटर – बेंगलोर, गांधीनगर (गुजरात) इ.
परीक्षा फी – उमेदवारांना परीक्षा फी रु. २४७.२०/- तर अजा/ अज/महिला/माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना सर्वपदांसाठी रु. ४७.२०/- असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://rectt.bsf.gov.in/ या वेबसाईटवरून दिनांक १५ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई- रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड ४) जातीचा दाखला उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास इन्कम अॅण्ड अॅसेट प्रमाणपत्र, डोमोसाईल प्रमाणपत्र, वैद्यकीय दृष्ट्या तंदरुस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://rectt.bsf.gov.in/ ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक १५ एप्रिल २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *