Air Force: Agniveer (Air) पदासाठी १२ वी/इंजि. डिपोमा उत्तीर्ण अविवाहित पुरुष व महिला उमेदवारांकडून दि.०६ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नांव – एअरमन अग्निवीर (वायु)
सायन्स पात्रता – उमेदवार सरासरी ५०% गुणांसह १२ वी सायन्स (फिजीक्स, गणित आणि इंग्रजी) उत्तीर्ण असावा तसेच इंग्रजी विषयासही ५०% गुण असणे आवश्यक. किंवा उमेदवार सरासरी ५०% गुणांसह इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स / इन्स्ट्रूमेंटेशन टेक्नॉलॉजी/आयटी) उत्तीर्ण असावा. परंतू इंग्रजी विषयास ही ५०% गुण असणे आवश्यक ज्या उमेदवारांनी डिप्लोमामध्ये इंग्रजी विषय अभ्यासलेला नाही अशा उमेदवारांना १० वी / १२ वीस इंग्रजी विषयात ५०% गुण असणे आवश्यक किंवा ५० % गुणांनी फिजीक्स, गणित आणि इंग्रजी विषयासह २ वर्षे कालावधीचा व्होकेशनल कोर्स उत्तीर्ण असावा. परंतू इंग्रजी विषयासही ५०% गुण असणे आवश्यक.ज्या उमेदवारांनी व्होकेशनल अभ्यासक्रमा मध्ये इंग्रजी विषय अभ्यासलेला नाही अशा उमेदवारांना १० वी / १२ वीस इंग्रजी विषयात ५०% गुण असणे आवश्यक.
सायन्स वगळून इतर पात्रता – उमेदवार सरासरी ५०% गुणांसह कोणत्याही शाखेमधुन १२ वी उत्तीर्ण असावा. परंतू इंग्रजी विषयासही ५०% गुण असणे आवश्यक.
वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. ०२ जानेवारी २००४ ते ०२ जुलै २००७ (दोन्ही दिवस धरून) या दरम्यान झालेला असावा.
शारीरिक पात्रता – उंची – १५२.५ सें.मी. असणे आवश्यक. छाती – कमीत कमी ५ सें.मी. फुगणे आवश्यक. वजन – उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे.
उमेदवाराकडे रातांधळेपणा, रंगांधळेपणा नसावा तसेच उमेदवाराची कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झालेली नसावी. श्रवण क्षमता चांगली असावी. उमेदवार शारीरिक आणि मानसिकंदृष्ट्या तंदरुस्त असावा.
वेतनश्रेणी – प्रशिक्षण काळात उमेदवारांना पहिल्यावर्षी रु ३०,०००/ द. म, दुसऱ्या वर्षी रु ३३,०००/- द. म, तिसऱ्यावर्षी रु ३६,५००/- द. म तर चौथ्या वर्षी रु ४०,०००/- द. म असे वेतन अदा केले जाईल. वेतनश्रेणीशिवाय रेशन, कपडे, राहण्याची सोय, ३० दिवसांची वार्षिक रजा, स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी विनामूल्य वैद्यकीय सेवा, सवलतीच्या दरात प्रवास, ४८ लाखांचा विमा इ. सोयी व सवलती दिल्या जातील. ४ वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना १०.४ लाख इतका सेवा निधी पॅकेज दिले जाईल.
सेवा कालावधी – उमेदवारांची नेमणूक ०४ वर्षांची असेल. ४ वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केल्या नंतर उमेदवारास हवाई दलामार्फत स्कील प्रमाणपत्र अदा केले जाईल. ज्याच्या आधारावर उमेदवारास इतर नोकरी साठी प्रयत्न करताना प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही स्थितीत उमेदवारास निवृत्त सैनिकाचा दर्जा दिला जाणार नाही.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, कागदपत्रे तपासणी, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकिय चाचणीद्वारे केली जाईल. सायन्स पात्रते साठी – प्रथम उमेदवारांची १ तास कालावधीची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये फिजिक्स, गणित आणि इंग्रजी या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. सायन्स वगळून इतर पात्रता – प्रथम उमेदवारांची ४५ मिनिटे कालावधीची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि सामान्यज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जातील. दोन्हीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी – प्रथम उमेदवारांची ८५ मिनिटे कालावधीची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये इंग्रजी, फिजिक्स, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्यज्ञान यावर आधारित प्रश्न विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेचा स्तर १२ वी समान असेल आणि परीक्षेचे माध्यम हिंदी व इंग्रजी असले. उमेदवारास प्रत्येक विषयात स्वतंत्ररित्या उत्तीर्ण होणे आवश्यक. प्रत्येक योग्य उत्तरासाठी १ गुण दिला जाईल तर चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये १.६ कि.मी धाव ०६ मि. ३० सेकंदामध्ये पूर्ण करणे, निर्धारीत केलेल्या वेळेत १० पुशअप्स, १० उठक-बैठक, २० स्क्वॅट्स इ. चाचण्यांचा समावेश असेल. शारीरिक क्षमता चाचणीस येताना उमेदवारांनी खेळाचे बुट आणि कपडे आणणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची कल क्षमता चाचणी (अॅडॅप्टिबिलीटी टेस्ट) घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीच्यावेळी ४-५ दिवस राहण्याच्या तयारीने यावे. कोणत्याही उमेदवारास जाता-येताचा प्रवासखर्च तसेच राहण्या-जेवणाचा खर्च दिला जाणार नाही.
लेखी परीक्षा दिनांक – १७ मार्च २०२४ पासून,
परीक्षा केंद्रे – उमेदवारांना अर्ज भरताना योग्य त्या परीक्षा केंद्राची निवड करावी लागेल. एकदा निवडलेले केंद्र बदलता येणार नाही.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्र ई-मेल तसेच वेबसाईटवर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्राच्या रंगीत प्रतीसह सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी रु५५०/- + जीएसटी अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/ क्रेडीट कार्ड/ डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक, यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक उमेदवारांनी www.agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवरून दि. १७ जानेवारी २०२४ ते दि. ०६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताचा अंगठा व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा त्यानंतर ऑनलाई पद्धतिने परीक्षा फी भरावी किंवा चलनाची प्रिंट काढून अॅक्सीस बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. उमेदवारांची अर्जाची रंगीत प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) पांढरी बॅकराऊंड असलेला अलीकडील काळात काढलेला दि. १ डिसेंबर २०२३ नंतर काढलेला फोटो (उमेदवारांनी फोटो काढताना काळ्या पाटीवर स्वत:चे नाव आणि फोटो काढलेला दिनांक कॅपीटल अक्षरात पांढऱ्या खडूने लिहिणे आवश्यक) २) सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ३) १० वी प्रमाणपत्र ४) १२ वी गुणपत्र ५) इंजि. डिप्लोमा गुणपत्रे ६) उमेदवार १८ वर्षाखालील असल्यास पालकांची सही ७) आधारकार्ड उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीवेळी ऑनलाईन अर्जाच्या रंगीत प्रिंटाऊट, फेज १ व फेज २ च्या प्रवेशपत्राची रंगीत प्रत, सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व प्रत्येकी ४-४ स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे ०८ फोटो, असल्यास एन.सी.सी. प्रमाणपत्राची मुळ प्रत व ४ स्वसाक्षांकित प्रती, अधीक पात्रता आणि इतर गुणवत्ता असल्यास तसे मुळ प्रमाणपत्र व ४ स्वक्षांकित प्रती, एअरफोर्समधील सेवेत असलेल्या कर्मचान्याच्या मुलांनी तसे प्रमाणपत्र / डिस्चार्ज बुक आणि त्याच्या ४ स्वसांक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. याशिवाय एचबी पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, स्टॅपलर, गम ट्युब आणि ब्ल्यू/ब्लॅक बॉल पॉईंट पेन सोबत घेऊन जाणे आवश्यक.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दि. १७ जानेवारी २०२४ ते दि. ०६ फेब्रुवारी २०२४