Mahavitaran I.T.I 5347 Vacancy 2024 - govtjobsu.com

Mahavitaran I.T.I 5347 Vacancy 2024

omkar
8 Min Read

महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी : ५३४७ विद्युत सहाय्यक पदांसाठी आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २० मार्च २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – विद्युत सहाय्यक

पदसंख्या – ५३४७ (ओपन २०८१ पैकी महिला ६२४, खेळाडू १०४, माजी सैनिक ३१२, प्रकल्पग्रस्त १०४, भूकंपग्रस्त ४२. शिकाऊ उमेदवार २०८, इतर ६८७, ईडब्ल्यूएस ५०० पैकी महिला १५०, खेळाडू २५, माजी सैनिक ७५, प्रकल्पग्रस्त २५, भूकंपग्रस्त १०, शिकाऊ उमेदवार ५०, इतर १६५, ओबीसी ८९५ पैकी महिला २६९, खेळाडू ४५, माजी सैनिक १३४, प्रकल्पग्रस्त ४५, भूकंपग्रस्त १८, शिकाऊ उमेदवार ९०, इतर २९४, अजा ६७३ पैकी महिला २०२, खेळाडू ३४, माजी सैनिक १०१, प्रकल्पग्रस्त ३४, भूकंपग्रस्त १३, शिकाऊ उमेदवार ६७, इतर २२२, अज ४९१ पैकी महिला १४७, खेळाडू २५, माजी सैनिक ७४, प्रकल्पग्रस्त २५, भूकंपग्रस्त १०, शिकाऊ उमेदवार ४९, इतर १६१, विजाअ १५० पैकी महिला ४५, खेळाडू ८, माजी सैनिक २३, प्रकल्पग्रस्त ८, भूकंपग्रस्त ३, शिकाऊ उमेदवार १५, इतर ४८, भजब १४५ पैकी महिला ४४, खेळाडू ७, माजी सैनिक २२, प्रकल्पग्रस्त ७, भूकंपग्रस्त ‘३, शिकाऊ उमेदवार १५, इतर ४७, भजक १९६ पैकी महिला ५९, खेळाडू १०, माजी सैनिक २९ प्रकल्पग्रस्त १०, भूकंपग्रस्त ४, शिकाऊ उमेदवार २०, इतर ६४, भजड १०८ पैकी महिला ३२, खेळाडू ५, माजी सैनिक १६, प्रकल्पग्रस्त ५, भूकंपग्रस्त २, शिकाऊ उमेदवार ११, इतर ३७, विमाप्र १०८ पैकी महिला ३२ खेळाडू ५, माजी सैनिक १६, प्रकल्पग्रस्त ५, भूकंपग्रस्त २, शिकाऊ उमेदवार ११, इतर ३७) पैकी अपंग ४२४ ( कर्णबधीर / एका पायाने अपंग), अनाथ ५३

शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी आणि आय. टी. आय (इलेक्ट्रीशियन / वायरमन) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार १० वी आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन (MCVC) यांचा दोन वर्ष कालावधीचा डिप्लोमा (इलेक्ट्रीशियन / वायरमन) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक असावा.

वयोमर्यादा – दि. २९ डिसेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. माजी सैनिक / अपंग उमेदवारांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. खेळाडू उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत, मात्र वयाची अट शिथिल करताना कोणत्याही प्रवर्गाची उच्चतम वयोमर्यादा ४३ वर्षे राहील. महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू नाही.. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी यांच्या अधिपत्याखालील महावितरण/महानिर्मिती / महापारेषण कंपनीमध्ये अप्रांटिस ट्रेनींग पूर्ण केलेल्या उमेदवारांना ट्रेनींग कालावधीएवढी वयात सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवार प्रथम वर्षी ₹१५०००/- द.म, द्वितीय वर्षी ₹ १६०००/- द.म तर तृतीय वर्षी ₹१७०००/- द. म असे विद्यावेतन अदा केले जाईल. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना तंत्रज्ञ या पदावर नियुक्ती देऊन ₹२५८८०-५०८३५/- अशा नियमित वेतनश्रेणीमध्ये सामावून घेतले जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) सदरची भरती ३ वर्षाच्या निश्चित कंत्राटी कालावधीकरिता असले. ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची तंत्रज्ञ या नियमीत पदावर नियुक्ती केली जाईल. ४) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. २९ डिसेंबर २०२४ रोजीचा धरली जाईल. ३) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. ४) प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची क्रिडाविषयक प्रमाणपत्रे योग्य दर्जाची असल्याबाबत व ते खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याबाबत, सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अर्ज सादर करण्यापूर्वी प्राप्त करणे आवश्यक आहे.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १५० गुणांची व २ तास कालावधीची असेल. यामध्ये संबंधित विषयाचे ज्ञान (५० प्रश्न- ११० गुण) आणि समान्यज्ञानाच्या अंतर्गत बुद्धिमत्ता (४० प्रश्न- २० गुण). अंकगणित (२० प्रश्न १० गुण) आणि मराठी भाषा (२० प्रश्न १० गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये ओपन उमेदवारांनी ४० % तर मागासवर्गीय उमेदवारांनी ३० % गुण मिळविणे आवश्यक. – ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळेलेले गुण (९० %) आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता / अधिकतम पात्रता यामध्ये मिळेलेले गुण (१०%) यानुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. यामधील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई- मेल/एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेच्या १० दिवस आधी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले मुळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी ₹२५०/- + जी.एस.टी १८ % तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ₹१२५/-+ जी.एस.टी १८% • अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अपंग व माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.mahadiscom.in या वेबसाईटवरून दि. २० मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बँकराऊंड असलेला) रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करून अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधारकार्ड ४) जातीचा दाखला ५) सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र ६) खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र

उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, ओबीसी, विजाअ, भजब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, अनाथ असल्यास तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय / निमशासकीय / विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. २० मार्च २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *