bombay mercantile bank recruitment 2024 | बॉम्बे मर्चटाईल बँक १३५ असिस्ट्स भर्ती - govtjobsu.com

bombay mercantile bank recruitment 2024 | बॉम्बे मर्चटाईल बँक १३५ असिस्ट्स भर्ती

omkar
4 Min Read

बॉम्बे मर्चटाईल बँक १३५ असिस्ट्स भर्ती | bombay mercantile bank recruitment 2024

bombay mercantile bank : १३५ प्रोब. ऑफीसर्स, ज्युनि. एक्झी. पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २५ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफीसर्स

पदसंख्या – ६०

पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – ज्युनिअर एक्झीक्युटीव्ह असिस्टंट्स

पदसंख्या – ७५

पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

 

वयोमर्यादा – दि. ०१ नोव्हेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे १८ ते ३५ वर्षापर्यंत असावे.

वेतन – उमेदवारांना बँकेच्या नियमाप्रमाणे वेतन अदा केले जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची, १५० प्रश्न१५० गुणांची आणि १२० मिनिटे कालावधीची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान (२५ प्रश्न२५ गुण), इंग्रजी भाषा (३० प्रश्न-३० गुण), बुद्धीमत्ता आणि संगणकाचे ज्ञान (३० प्रश्न-३० गुण), अंकगणित (२५ प्रश्न-२५ गुण), सामान्य बँकींग (४० प्रश्न-४० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जाईल. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रातील पुणे, मुंबई/ठाणे/बृहन्मुंबई/नवी मुंबई, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, अहमदाबाद/गांधीनगर, हैद्राबाद, दिल्ली, श्रीनगर, जयपूर, लखनऊ, भोपाळ, कोलकत्ता, पटना, अलाहाबाद ही परीक्षा केंद्रे आहेत.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्राबाबत ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र /ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांना रु.७००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडीटकार्ड/डेबीटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://bmcbankltd.com/ या वेबसाईटवरून दि. २५ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची (प्राधान्याने पांढरी) बॅकग्राऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची (प्राधान्याने पांढऱ्या बॅकग्राऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) आधारकार्ड उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी /अज / अजा उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/ निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://bmcbankltd.com/ ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २५ डिसेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *