army ordnance corps (AOC) : ७९३ ट्रेड्समन मेट, फायरमन पदांसाठी १० वी / १२ वी / पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक २२ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
१) पदाचे नांव – ट्रेडसमन मेट
पदसंख्या – ३८९ (ओपन १५९, ईडब्ल्यूएस ३८, ओबीसी १०५, अजा ५८, अज २९) पैकी माजी सैनिक ३८, खेळाडू ६२, अपंग १५
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
शारीरिक क्षमता चाचणी – १) १.५ कीमी धाव ५ मिनिट मध्ये पुर्ण करणे (महिला उमेदवार ८ मिनिट २६ सेकंदामध्ये) २) ५० किग्रॅ वजन घेऊन २०० मीटर अंतर १०० सेकंदामध्ये पुर्ण करणे.
२) पदाचे नांव – फायरमन
पदसंख्या – २४७ (ओपन १०२, ईडब्ल्यूएस २४, ओबीसी ६६, अजा ३७, अज १८) पैकी माजी सैनिक २४, अपंग ०९
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता – उंची (बुटाशिवाय) : १६५ सेंमी (अज उमेदवारांना उंची मध्ये २.५ सेमी. सवलत), छाती (न-फूगवता) : ८१.५ सेंमी, छाती (फूगवून) : ८५ सेमी, वजन : किमान ५० किग्रॅ
शारीरिक क्षमता चाचणी – १) १.६ कीमी धाव ६ मिनिट मध्ये पुर्ण करणे (महिला उमेदवार – ८ मिनिट २६ सेकंदामध्ये) २) ६५.५ किग्रॅ वजनाचा माणूस घेऊन १८३ मीटर अंतर ९६ सेकंदामध्ये पुर्ण करणे ३) २.७ मीटर रुंद खड्डा दोन्ही पायाच्या सहाय्याने लांब उडी मारुन पुर्ण करणे. ४) ३ मीटर उभा दोर हात व पायाच्या सहाय्याने चढणे.
३) पदाचे नांव – मटेरीअल असिस्टंट
पदसंख्या – १९ (ओपन १०, ईडब्ल्यूएस ०१, ओबीसी ०५, अजा ०२, अज ०१) पैकी माजी सैनिक ०१
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार डिप्लोमा (मटेरीअल मॅनेजमेंट) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार कोणताही इंजि. डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नांव – ज्युनिअर ऑफीस असिस्टंट
पदसंख्या – २७ (ओपन १२, ईडब्ल्यूएस ०२, ओबीसी ०७, अजा ०४, अज ०२) पैकी माजी सैनिक ०२, अपंग १
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. संगणकावर टायपिंग गती हिंदी ३० शप्रमी किंवा इंग्रजी ३५ शप्रमी आवश्यक.
५) पदाचे नांव – सिव्हील मोटर ड्रायव्हर
पदसंख्या – ४ (ओपन ३, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. जड वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
६) पदाचे नांव – टेलीफोन ऑपरेटर
पदसंख्या – १४ (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २, अज १) पैकी माजीसैनिक १
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. पीबीएक्सबोर्ड हाताळण्याचे ज्ञान आवश्यक.
७) पदाचे नांव – कार्पेटर अँण्ड जॉईंटर
पदसंख्या – ०७ (ओपन ५, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय (कार्पेटर) उत्तीर्ण असावा.
८) पदाचे नांव – पेंटर अँण्ड डेकोरेटर
पदसंख्या – ५ (ओपन ४, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय (पेंटर) उत्तीर्ण असावा.
९) पदाचे नांव – मल्टी टास्कींग स्टाफ
पदसंख्या – ११ (ओपन ७, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा १) पैकी माजीसैनिक १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय मटेरीअल असिस्टंट, सिव्हील मोटर ड्रायव्हर पदांसाठी २७ वर्षांपर्यंत तर उर्वरीत सर्व पदांसाठी २५ वर्षापर्यंत असावे. अजा/ अज ५ वर्षे तर ओबीसीना ३ वर्षे सवलत. खेळाडू ५ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवाराना १५ वर्षे सवलत, विभागीय कर्मचारी ४० पर्यंत, माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत. विधवा/घटस्फोटीत/ कायदेशिर रित्या विभक्त पुर्नविवाह न झालेल्या ओपन महिलांना ३५ पर्यंत, अजा/अज ४० पर्यंत वयात सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना मटेरीअल असिस्टंट पदांसाठी रु.२९,२००-९२,३००/-, ट्रेड्समन पदांसाठी रु.१८,०००-५६,९००/- तर उर्वरीत सर्वपदांसाठी रु.१९,९००-६३,२००/ – असे वेतन अदा केले जाईल. याशिवाय उमेदवारास सर्व त्या सोयी, सवलती, भत्ते प्रदान करण्यात येतील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवाराचे वय व शैक्षणिक पात्रता दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड शारिरिक मोजमाप चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करून त्यामधील पात्र उमेदवारांची शारिरीक मोजमाप चाचणी आणि शारिरीक क्षमता चाचणी घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १५० प्रश्न, १५० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. लेखी परीक्षेमध्ये बुद्धीमत्ता (५० प्रश्न, ५० गुण), अंकगणित (२५ प्रश्न, २५ गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न, २५ गुण), इंग्रजी भाषा (५० प्रश्न, ५० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण बजा केले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. लेखी परीक्षा आणि मुलाखती वेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी https://www.aocrecruitment.gov.in/ या वेबसाईटवरुन दिनांक २२ डिसेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करणेपूर्वी उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक. नसल्यास नवीन ईमेल आयडी प्राप्त करून घ्यावा. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन अर्जात उमेदवारांनी स्कॅन्ड फोटो व सही अपलोड करावी तसेच इतर माहिती भरावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करावा. ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढून स्वत: जवळ ठेवावी. तसेच प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. उमेदवारांनी अर्जाची प्रिंटाऊट आणि कागदपत्रे कोणत्याही पत्त्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे गुणपत्रे ३) आधार कार्ड (असल्यास)
उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत सर्व शैक्षणिक व व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला, अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती व मुळ प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/महामंडळाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपले अर्ज योग्य त्या यंत्रणे मार्फत भरावेत व निवडीच्या वेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी https://www.aocrecruitment.gov.in/ ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – २२ डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *