बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन पुणे ४६६ ड्रायव्हर, मशिनिस्ट, टर्नर इ. | border road organization pune bharti 2024 notification
Border Road Organization Pune 466 Driver, Machinist, Turner : पदांसाठी १० वी/आय.आय.टी.आय./पदवी उत्तीर्ण पुरुष उमेदवारांकडून दिनांक ३० डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (ऑर्डनरी ग्रेड) (पोस्ट क्रमांक ५),
पदसंख्या – ४१७ (ओपन २०८, ईडब्ल्यूएस ५१, ओबीसी ६१, अजा ६१, अज ३६)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक किंवा उमेदवार संरक्षण सेवेतील सैनिक असल्यास क्लास- ।।। (ड्रायवर प्लान्ट मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट) कोर्स उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – ड्राफ्टस्मन (पोस्ट क्रमांक १),
पदसंख्या – १६ (ओपन १०, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार १२ वी विज्ञान आणि दोन वर्षे कालावधीचा प्रमाणपत्र कोर्स (आर्किटेक्चर / ड्राफ्टस्मनशिप) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार १२ वी विज्ञान आणि ड्राफ्टस्मन सिव्हिल ट्रेडमधून NTC प्रमाणपत्र धारक असावा. संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
३) पदाचे नाव – सुपरवायझर ( अँडमिनिस्ट्रेशन ) ( पोस्ट क्रमांक २),
पदसंख्या – ओपन २
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. NCC बी प्रमाणपत्रधारक असावा किंवा माजी सैनिक असावा.
४) पदाचे नाव – टर्नर (पोस्ट क्रमांक ३),
पदसंख्या – १० (ओपन ५, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा १)
पात्रता – उमेदवार १० वी आय. टी. आय (टर्नर) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार संरक्षण सेवेतील सैनिक असल्यास डिफेन्स ट्रेड सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार संरक्षण सेवेतील सैनिक असल्यास क्लास-।। वेल्डर कोर्स उत्तीर्ण असावा.
५) पदाचे नाव – मशिनिस्ट (पोस्ट क्रमांक ४),
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १० वी आय.टी.आय (मशिनिस्ट) उत्तीर्ण असावा. किंवा उमेदवार संरक्षण सेवेतील सैनिक असल्यास डिफेन्स ट्रेड सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार संरक्षण सेवेतील सैनिक असल्यास क्लास-।। वेल्डर कोर्स उत्तीर्ण असावा.
६) पदाचे नाव – ड्रायव्हर रोड रोलर ( पोस्ट क्रमांक ६),
पदसंख्या – अज १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे जह वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक. रोडरोलर चालविण्याचा किमान ६ महिन्यांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार संरक्षण सेवेतील सैनिक असल्यास क्लास – || (ड्रायवर प्लान्ट मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट) कोर्स उत्तीर्ण असावा.
७) पदाचे नाव – ऑपरेटर एक्सकेव्हेटींग मशिनिरी (पोस्ट क्रमांक ७),
पदसंख्या – १८ (ओबीसी १४, अजा ३, अज १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे जड वाहन चालविण्याचा वैध परवाना असणे आवश्यक किंवा उमेदवार संरक्षण सेवेतील सैनिक असल्यास क्लास – ।। (ड्रायवर प्लान्ट मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट) कोर्स उत्तीर्ण असावा.
शारिरीक पात्रता – (सर्व पदांसाठी) उंची – किमान १५७ सें.मी. छाती – किमान ७५ सें.मी, ५ सें.मी. फुगणे आवश्यक. वजन – किमान ५० कि.ग्रॅ. दृष्टी – चष्म्यासह / चष्म्याशिवाय चांगला डोळा ६/१२, खराब डोळा ६/३६ अशी असावी. उमेदवार मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या काम करण्यास तंदरुस्त असावा.
वयोमर्यादा – दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी पद क्रं. ४ साठी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत तर उर्वरीत सर्वपदांसाठी १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंगउमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत, ओपन शासकीय कर्मचारी ४० वर्षांपर्यंत, ओबीसी ४३ वर्षांपर्यंत तर अजा/ अज शासकीय कर्मचाऱ्यांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमदेवारांना पद क्रमांक २ साठी रु.२९,२००-९२,३००/-, पद क्रमांक ३ साठी रु.२५,५००-८१,१००/-तर उर्वरीत सर्व पदांसाठी रु.१९,९००-६३,२००/- वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती, भत्ते प्रदान करण्यात येतील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ३० डिसेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारिरीक क्षमता चाचणी आणि प्रॅक्टीकल टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी / वर्णनात्मक स्वरुपाची असेल. यामध्ये सामान्यज्ञान आणि संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेमध्ये ओपन/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ओबीसी उमेदवारांनी किमान ५० % तर अजा/अज उमेदवारांनी ४० % गुण मिळविणे आवश्यक, शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. यामध्ये १ मैल धाव १० मिनिटांमध्ये पूर्ण करणे या चाचणीचा समावेश असेल. माजी सैनिक व विभागीयः कर्मचाऱ्यांची ही चाचणी घेतली जाणार नाही. शारीरिक क्षमता चाचणीमधील पात्र उमेदवारांची संबंधित ट्रेडनुसार प्रॅक्टीकल टेस्ट घेण्यात येईल. प्रॅक्टीकल टेस्टमधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेऊन आणि कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत पोस्टाद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रवेशपत्रासाठी प्राधान्यक्रम – शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांव्यतिरिक्त एनसीसी ‘C’ प्रमाणपत्रधारक उमेदवारांना १० %, एनसीसी ‘B’ प्रमाणपत्रधारक उमेदवारांना ५%, माजी सैनिकांच्या पाल्यांना ३ %, राज्य / जिल्हा / महाविद्यालय स्तरावरील खेळाडू उमेदवारांना ५ %, सेवेत असलेल्या / निवृत्त GREF कर्मचाऱ्यांच्या एका पाल्याला १५ % तर कॅज्युएल पेड लेबरला १० % गुण अधिक दिले जातील.
परीक्षा फी – ओपन, ईडब्ल्यूएस, ओबीसी आणि माजी सैनिक उमेदवारांना परीक्षा फी रु.५० अशी असून ती एसबीआय कलेक्टद्वारे (https://www.onlinesbi.sbi/sbicollect / ऑनलाईन icollecthome.htm?corpID=1232156) पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज रजिस्टर्ड पोस्टाने (अँकनॉलेजमेंट सह) पाठवावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) परीक्षा फी ई- रिसीट २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) वयाचा दाखला ५) जातीचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ६) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ७) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र ८) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ९) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र १०) रहिवासी दाखला ११) फोटो असलेले ओळखपत्र १२) एनसीसी C/B प्रमाणपत्रधारक असल्यास तसे प्रमाणपत्र १३) माजी सैनिकांचे पाल्य असल्यास रिलेशन शिप सर्टीफिकेट, १४) राज्य/जिल्हा / महाविद्यालय स्तरावरील खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र १५) सेवेत असलेल्या/निवृत्त GREF कर्मचाऱ्यांचे पाल्य असल्यास तसे प्रमाणपत्र १६) कॅज्युएल पेड लेबर असल्यास तसे प्रमाणपत्र १७) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा गॅझेटेड ऑफीसरने साक्षांकित केलेला रंगीत फोटो चिकटवावा असाच आणखी एक फोटो अँटमिट कार्डवर चिकटवावा.
उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF_________ Category UR / SC / ST / OBC/EWSs/ESM/CPL, WEIGHTAGE PERCENTAGE IN ESSENTIAL QUALIFICATION_______” असे लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/ विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळेस वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती, आधारकार्ड, प्रवेशपत्र तसेच अर्जावर चिकटवलेल्या फोटोसारखे किमान ८ फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – Commandant, General Reserve Engineer Force Centre, Dighi Camp, Pune-411015
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – ३० डिसेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सुचना – सर्व प्रमाणपत्रे हिंदी/इंग्रजी भाषेमध्ये नसल्यास ती इंग्रजी/हिंदी भाषेमध्ये भाषांतरीत करुन घ्यावीत व त्यांच्या ग्रुप ए गॅझेटेड ऑफीसरने साक्षांकित केलेल्या प्रती अर्जा सोबत जोडाव्यात.