Maharashtra Urban Co Bank Officers Recruitment | महाराष्ट्र अर्बन को बँक ऑफिसर्स भर्ती - govtjobsu.com

Maharashtra Urban Co Bank Officers Recruitment | महाराष्ट्र अर्बन को बँक ऑफिसर्स भर्ती

omkar
6 Min Read

महाराष्ट्र अर्बन को बँक ऑफिसर्स भर्ती | Maharashtra Urban Co Bank Officers Recruitment

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड : ऑफीसर्स इ. पदांसाठी पदवी/उच्च पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – बृहन्मुंबई व पुणे शहर

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. MSCIT उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

मानधन – उमेदवारांना रु.६६० – ४२३५/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

२) पदाचे नाव – आयटी व्यवस्थापक

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – मुंबई

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. MSCIT उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

मानधन – उमेदवारांना रु.६६० – ४२३५/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

३) पदाचे नाव – लेखाधिकारी

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – बृहन्मुंबई व पुणे शहर

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. MSCIT उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

मानधन – उमेदवारांना रु.६६० – ४२३५/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

४) पदाचे नाव – वरिष्ठ अधिकारी

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – बृहन्मुंबई व पुणे शहर

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. MSCIT उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

मानधन – उमेदवारांना रु.५८५ – ३८१०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

५) पदाचे नाव – अधिकारी

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – बृहन्मुंबई व पुणे शहर

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. MSCIT उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक,

मानधन – उमेदवारांना रु. ४९०-३३४०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

६) पदाचे नाव – आयटी अधिकारी

पदसंख्या –

पदभरतीचे ठिकाण – बृहन्मुंबई व पुणे शहर

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. MSCIT उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक,

मानधन – उमेदवारांना रु.४९० – ३३४०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

७) पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक

पदसंख्या – १२

पदभरतीचे ठिकाण – बृहन्मुंबई व पुणे शहर

पात्रता उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. MSCIT उत्तीर्ण असावा.

मानधन – उमेदवारांना रु.३५० – २३५०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

वयोमर्यादा – दि. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय पद क्रमांक १ ते ३ साठी ३० ते ४० वर्षापर्यंत, पद क्रमांक ४ व ६ ३ साठी ३० ते ३५ वर्षापर्यंत, पद क्रमांक ५ साठी २५ ते ३५ वर्षापर्यंत तर पद क्रमांक ७ साठी २२ ते ३५ वर्षापर्यंत असावे.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करून त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा १०० गुणांची, २ तास कालावधीची आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. यामध्ये इंग्रजी भाषा (२० प्रश्न, १० गुण), बुद्धीमत्ता (२० प्रश्न, २० गुण), अंकगणित (४० प्रश्न, ४० गुण), संगणक आणि सहकार ज्ञान (२० प्रश्न, १० गुण), बँकींग आणि सामान्य ज्ञान (२० प्रश्न, २० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि मराठी असेल. लेखी परीक्षेत ५०% गुण मिळवणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रातील मुंबई आणि ठाणे शहर

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्राबाबत ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांना पद क्रमांक ७ साठी रु.११२१/- तर उर्वरीत सर्वपदांसाठी रु.५९०/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडीटकार्ड/डेबीटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://mucbf.com/ या वेबसाईटवरून दि. २६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात

स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची (प्राधान्याने पांढरी) बॅकग्राऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची (प्राधान्याने पांढऱ्या बॅकग्राऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) आधारकार्ड

उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी/अज/अजा उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/ निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://mucbf.com/ ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २६ नोव्हेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *