MH- NURSING CET 2024:बी.एस्सी नर्सिंग प्रवेश परीक्षेसाठी १२ वी उत्तीर्ण/बसलेल्या उमेदवारांकडून दि. २९ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
परीक्षेचे नाव – बी.एस्सी नर्सिंग – सीईटी २०२४
पात्रता – उमेदवार ४५ % गुणांनी १२ वी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विषयासह) उत्तीर्ण असावा (मागासवर्गीय / अपंग उमेदवारांना गुणांमध्ये ५% सवलत). १२ वी परीक्षेस बसलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र.
परीक्षेचे स्वरूप – उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० गुणांची व ९० मिनीटे कालावधीचे असेल. परीक्षेमध्ये इंग्रजी भाषा (२० प्रश्न, २० गुण), फिजिक्स (२० प्रश्न, २० गुण), नर्सिंग ॲप्टीट्युड (२० प्रश्न, २० गुण), केमिस्ट्री (२० प्रश्न, २० गुण), बायोलॉजी (२० प्रश्न, २० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम इंग्रजी असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जातील.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ इ.) पैकी एका प्रमाणपत्रांची मुळ व छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी ₹१०००/- तर मागासवर्गीय व अपंग उमेदवारांसाठी ₹८००/-, तसेच महाराष्ट्राबाहेरील सर्व उमेदवारांसाठी ₹८००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकींग/ क्रेडीटकार्ड/डेबीटकार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://cetcell.mahacet.org/ या वेबसाईट वरून दि. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिकट रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला) फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिकट रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड असलेला) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक/व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड उमेदवारांनी प्रवेशाच्यावेळी ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट, ई- रिसीट, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे,गुणपत्रे, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी नॉन-क्रिमीलीअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला.इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक २९ फेब्रुवारी २०२४