ITBP Sub Inspector, Constables Bharti | ITBP सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल्स भर्ती. - govtjobsu.com

ITBP Sub Inspector, Constables Bharti | ITBP सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल्स भर्ती.

omkar
8 Min Read

ITBP सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल्स भर्ती | ITBP Sub Inspector, Constables Bharti

ITBP : सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल इ. पदांसाठी १० वी/१२ वी/पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २६ नोव्हेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – असिस्टंट सबइन्स्पेक्टर (लॅबोरेटरी टेक्नीशिअन)

पदसंख्या – (ओपन ०२, ईडब्लूएस ०२, ओबीसी ०३)

पात्रता – उमेदवार १२ वी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी विषयांसह) उत्तीर्ण असावा. डिप्लोमा (मेडीकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

२) पदाचे नाव – असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (रेडीओग्राफर)

पदसंख्या – ओपन ३

पात्रता – उमेदवार १२ वी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी विषयांसह) उत्तीर्ण असावा. डिप्लोमा (रेडीओ डायग्नोसिस) उत्तीर्ण असावा.

 

३) पदाचे नाव – असिस्टंट सब इन्स्पेक्टर (ओटी टेक्निशिअन )

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण असावा. डिप्लोमा (ऑपरेशन थिएटर) उत्तीर्ण असावा.

 

४) पदाचे नाव – असिस्टंट सब-इन्स्पेक्टर (फिजिओथेरपिस्ट)

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार १२ वी (विज्ञान) उत्तीर्ण असावा. डिप्लोमा (फिजिओथेरपी) उत्तीर्ण असावा.

 

५) पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रेसर),

पदसंख्या – ओपन ३ 

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

६) पदाचे नाव – कॉन्स्टेबल (लिनन किपर),

पदसंख्या – ओपन १

पात्रता – उमेदवार विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

 

७) पदाचे नाव – कॉन्स्टेबल (टेलिफोन ऑपरेटर कम रिशेप्सनिस्ट),

पदसंख्या – ओपन २

पात्रता – उमेदवार विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

८) पदाचे नाव – कॉन्स्टेबल (शिपाई),

पदसंख्या – अज १

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

 

वयोमर्यादा – दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय पद क्रमांक १ व २ साठी २० ते २८ वर्षांपर्यंत तर उर्वरीत सर्व पदांसाठी १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज/महिला उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

 

शारीरिक पात्रता

पुरूष उमेदवारांसाठी

जातीचे नाव

उंची

छाती

फुगवता

फुगवून

जनरल, ओबीसी, अजा

१७० सेंमी. ८०

८५

मराठा, डोग्राज इ.

१६५ सेंमी. ८०

८५

अज उमेदवार

१६२.५ सेंमी. ७७

८२

 

महिला उमेदवारांसाठी

जातीचे नाव

उंची

नरल, ओबीसी, अजा

१५७  सेंमी.

मराठा, डोग्राज इ.

१५५ सेंमी.

अज उमेदवार

 १५२.५ सेंमी.

 

वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात असावे.

दृष्टी – जवळची दृष्टी चांगला डोळा N६ खराब डोळा N ९ आणि दुरदृष्टी चांगला डोळा ६/६ आणि खराब डोळा ६/९ . कलर व्हीजन CP III असणे आवश्यक. ज्या उमेदवारांना उंची व छातीच्या मोजमापात सवलत हवी असेल तर त्यांनी तसे प्रमाणपत्र निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक. गुडघ्याला गुडघे टेकणे, सपाट तळवे, तटतटलेल्या शिरा, रातांधळेपणा, रंगांधळेपणा, तिरळेपणा इत्यादी विकार असलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नयेत, उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ ते ४ साठी  रु.२९,२००९२,३००/- उर्वरीत सर्व पदांसाठी रु.२१,७०० ६९,१००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इंडो तिबेटियन पोलिस दलाच्या सर्व सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, कागदपत्रे तपासणी, लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक चाचणी आणि वैद्यकिय चाचणीद्वारे केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची शारीरीक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये पुरूष उमेदवारांना – १०० मीटर धाव १६ सेंकदात पुर्ण करणे, १.६ किलोमीटर धाव ७ मिनिट ३० सेंकदात पुर्ण करणे, तर महिला उमेदवारांना – १०० मीटर धाव १८ सेंकदात पुर्ण करणे, ८०० मीटर धाव ४ मिनिट ४५ सेंकदात पुर्ण करणे, याचा समावेश असेल. माजी सैनिकांची ही चाचणी घेतली जाणार नाही. शारिरीक क्षमता चाचणीमधील पात्र उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची १०० गुणांची २ तास कालवधीची लेखी परीक्षा घेतली जाईल. यामध्ये सामान्य बुद्धीमत्ता (१० प्रश्न – १० गुण) सामान्य ज्ञान (१० प्रश्न १० गुण), अंकगणित (१० प्रश्न – १० गुण), इंग्रजी / हिंदी भाषा (१० प्रश्न १० गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (६० प्रश्न- ६० गुण) यावर अधारीत प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. यामध्ये पात्र होण्यासाठी ओपन व ईडब्लूएस उमेदवारांनी किमान ३५% व ओबीसी / अजा/अज उमेदवारांनी किमान ३३ % गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची १०० गुणांची प्रात्यक्षिक चाचणी घेण्यात येईल. यामध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातील. प्रात्यक्षिक चाचणी मध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांनी किमान ५०% गुण मिळवणे आवश्यक. लेखी परीक्षा व प्रात्यक्षिक मध्ये मिळालेल्या गुणांच्या अधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामधील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व वैद्यकिय चाचणी करून अंतिम निवड केली जाईल. वैद्यकिय चाचणी बाबत – वैद्यकिय चाचणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार १५ दिवसांच्या आता पुर्नचाचणीसाठी विनंती अर्ज करु शकतात. (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र, /ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा वेळ व दिनांक याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांना प्रवेशपत्र ई-मेल द्वारे/ वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेणे आवश्यक परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र उपस्थित रहावे व २ ते ३ दिवस राहण्याच्या तयारीने यावे.

परीक्षा फी – ओपन, ईडब्लूएस, ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.१०० अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक, अजा/अज / महिला / माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक, यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असने आवश्यक. उमेदवारांनी www.recruitment.itbpolice.nic.in वेबसाईटवरून दि. २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड ४) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ५) जातीचा दाखला ६) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र (७) पॅन कार्ड ८) ४ पासपोर्ट फोटो

उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला (१० वी प्रमाणपत्र) असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, डोमोसाईल प्रमाणपत्र, उंची व छातीमध्ये सवलत घेत असल्यास तसे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र व ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय / निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.recruitment.itbpolice.nic.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – २६ नोव्हेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *