CAPFs मेडिकल ऑफिसर्स भर्ती | CAPFs Medical Officers vacancy
सेंट्रल आर्म्स पोलीस फोर्स (ITPB, BSF, SSB इ.) : ३४५ मेडिकल ऑफिसर इ. पदांसाठी एम.बी.बी.एस उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १४ नोव्हेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)
एकूण पदसंख्या – १६४,
विभागानुसार पदविभागणी –
• ITBP – ६२ (ओपन २७, ईडब्ल्यूएस ०३, ओबीसी १६, अजा ११, अज ०५)
• BSF – २८ (ओपन १३, ईडब्ल्यूएस ०२, ओबीसी ०७, अजा ०४, अज ०२)
• CRPF – ४६ (ओपन १६, ईडब्ल्यूएस ०४, ओबीसी १४, अजा ०९, अज ०३)
• SSB – २१ (ओपन १०, ईडब्ल्यूएस ०२, ओबीसी ०३, अजा ११, अज ०५)
• Assam Rifles – ०७ (ओपन ०२, ईडब्ल्यूएस ०१, ओबीसी ०२, अजा ०१, अज ०१)
पात्रता – उमेदवार भारतीय वैद्यकिय परिषद अधिनियम १९५६ ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय परिशिष्ट मध्ये निर्दिष्ट केलेली किंवा तृतीय परिशिष्ट मधील भाग २ मध्ये निर्दिष्ट केलेली वैद्यकिय पात्रता उत्तीर्ण असावा. इंटर्नशिप पूर्ण झालेली असणे आवश्यक. मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक.
याशिवाय सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड इन कमांड) (०५ पदे) आणि स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (मेडिसिन / सर्जरी/गायनॉकॉलॉजी अँण्ड ऑब्स्टेट्रिक्स, अँन्स्थेशिया, रेडिओलॉजी/पॅथॉलॉजी/आय (eye) (डेप्युटी कमांडंट) (१७६ पदे) पदांच्या सविस्तर तपशीलासाठी www.recruitment.itbpolice.nic.in ही वेबसाईट पहावी.
शारीरिक पात्रता |
|||
पुरूष उमेदवारांसाठी |
|||
जातीचे नाव |
उंची |
छाती |
|
|
न फुगवता |
फुगवून |
|
ओपन, ओबीसी, अजा |
१५७.५ सेंमी. |
७७ |
८२ |
मराठा, डोग्राज इ. |
१५५.५ सेंमी. |
७७ |
८२ |
अज उमेदवार |
१५४.५ सेंमी. |
७७ |
८२ |
महिला उमेदवारांसाठी |
||
जातीचे नाव |
उंची |
|
ओपन, ओबीसी, अजा |
१४२ सेंमी. | |
मराठा, डोग्राज इ. |
१४० सेंमी. |
|
अज उमेदवार |
१३९ सेंमी. |
दृष्टी – जवळची दृष्टी चांगला डोळा N ६ खराब डोळा N ९ आणि दुरदृष्टी चांगला डोळा ६/६ आणि खराब डोळा ६/१२. कलर व्हीजन CP III.
गुडघ्याला गुडघे टेकणे, सपाट तळवे, शिरा तटतटलेल्या, रातांधळेपणा, रंगाधळेपणा, तिरळेपणा इत्यादी विकार असलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नयेत. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा. अपंग उमेदवार अर्ज करण्यास अपात्र.
वयोमर्यादा – दि. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे ३० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. शासकीय कर्मचारी व आर्मी मेडिकल कॉसमधून निवृत्त उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.५६,१००-१,७७,५००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सर्व सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखत आणि वैद्यकिय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची २०० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. यामध्ये मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) पदांसाठी उमेदवारांनी किमान ४० % गुण मिळविणे आवश्यक. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची वैद्यकिय चाचणी घेण्यात येईल. वैद्यकिय चाचणीमधील पात्र उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
प्रोबेशन कालावधी – २ वर्षे
वैद्यकिय चाचणी बाबत – वैद्यकिय चाचणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार १५ दिवसांच्या आत पुर्नचाचणीसाठी विनंती अर्ज करु शकतात. मात्र यासाठी उमेदवारांनी मेडिकल सर्टिफिकेटसोबत रिजेक्शन स्लीप आणि रु.१०० अशी परीक्षा फी DDO, Directrorate General, ITB Police, New Delhi यांच्या नावे इंडियन पोस्टल ऑर्डर स्वरुपात जोडणे आवश्यक. उमेदवारांनी विनंती अर्ज Inspector General (HQrs), Directorate General, ITB Police Force, Block – 2, CGO Complex, Lodhi Road, New Delhi 110003 या पत्यावर पोस्टाने पाठवावेत.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) इ. सोबत घेऊन जाणे आवश्यक. ISTRIC
परीक्षा फी – ओपन/ओबीसी उमेदवारांना परीक्षा फी रु.४००/अशी असून ती नेटबँकिंग/ क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. महिला/ अजा/अज/माजी सैनिक उमेदवारांना कोणतीही परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईटवरून दि. १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड ४) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ५) जातीचा दाखला ६) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, डोमोसाईल प्रमाणपत्र, उंची व छातीमध्ये सवलत घेत असल्यास विहित नमुन्यातील प्रमाणपत्र व ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.recruitment.itbpolice.nic.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १४ नोव्हेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *