Solapur District Urban Bank: Sepoys etc. - govtjobsu.com

Solapur District Urban Bank: Sepoys etc.

omkar
5 Min Read

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स को-ऑप. लि : लिपीक, शिपाई इ. पदांसाठी १० वी/पदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २२ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे

 

१) पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक/व इतर तत्सम अधिकारी

पदसंख्या – ३ (ओपन १, ईडब्ल्यूएस १. अजा १)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. एम.एस. सी. आय.टी. उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१३०० – ३४८००+ ग्रेड पे ₹ ४३००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

२) पदाचे नाव – सहा. अधिकारी

पदसंख्या – ३ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹५२०० – २०२०० + ग्रेड पे ₹ ३५००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

३) पदाचे नाव – वरिष्ठ लिपिक

पदसंख्या – १४ (ओपन ५, ईडब्ल्युएस २, ओबीसी ३, अजा १, भजब १ , भजक १, भजड १)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹५२०० – २०२०० + ग्रेड पे ₹ २४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

४) पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक

पदसंख्या – ६ (ओपन २, ईडब्ल्युएस २, ओबीसी २)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹५२०० – २०२०० + ग्रेड पे ₹ १९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

५) पदाचे नाव – शिपाई

पदसंख्या – १७ (ओपन ६, ईडब्ल्युएस २, ओबीसी ५, अजा १, अज १, विजाअ १, विमाप्र १)

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹४४४० – ७४४० + ग्रेड पे ₹ १३००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

वयोमर्यादा – दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षापर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे, अपंग १० वर्षे, माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवारांचे वय, पात्रता दि. ३१ डिसेंबर २०२३ रोजीचे धरले जाईल ३) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि द्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ९० गुणांची आणि ९० मिनेटे कालावधीची असेल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रोबेशन कालावधी – १ वर्षे

प्रवेशपत्राबाबत- उमेदवारांना परीक्षेचा दिनांक, वेळ व ठिकाण याबाबत प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करुन घेणे आवश्यक उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. लेखी परीक्षेच्यावेळेस फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांना रु ७९७/- अशी असून ती नेटबँकींग/क्रेडीटकार्ड/डेबीटकार्ड द्वारे भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा. उमेदवारांनी http:// surbanksassociation.com या वेबसाईटवरून दि. २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही अपलोड करावी. व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. त्यानंतर अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविणे आवश्यकता नाही.

       ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असेलेला प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो व सही २) आधार कार्ड (असल्यास) ३) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र मात्र निवडीच्या वेळेस ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट, परीक्षा फी ई-रिसीट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी उमेदवारांनी http://surbanksassociation.com ही वेबसाईट पहावी. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दि. २२ फेब्रुवारी – २०२४

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *