नॅशनल इन्स्टीट्युट, हैद्राबाद:मल्टी टास्कींग स्टाफ इ. पदांसाठी १० वी/डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०५ मार्च २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – गार्डनर, पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. डिप्लोमा (हॉर्टीकल्चर) उत्तीर्ण असावा.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,००० ५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व प्रकारच्या सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
२) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ
पदसंख्या – २ (ईडब्ल्युएस १, अजा १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,००० – ५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व प्रकारच्या सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
वयोमर्यादा – दि. ०५ मार्च २०२४ रोजी ओपन उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे सवलत. शासकीय कर्मचाऱ्यांना वयामध्ये ४० वर्षापर्यंत तर माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कीलटेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. यामध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातील. त्यामधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
परीक्षा फी – ओपन उमेदवारांना परीक्षा फी रु.२९५/- तर ओबीसी उमेदवारांना रु. १७७/- अशी परीक्षा फी असून ती एसबीआय कलेक्टद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक. परीक्षा फी चे सविस्तर माहितीपुढीलप्रमाणे –
Account Number : 40373518076
Corporate Address: National Institute of Plant Health Management, Rajendranagar, Hyderbad, Telangana 500030
Branch: Rajendranagar Branch, Hyderabad (20074)
IFS Code: SBIN0020074
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायस्नस) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज साध्या/स्पीड पोस्टानेच पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचे प्रमाणपत्र व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ४) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ५) वैध ड्रायव्हिंग लायसन्स ६) अनुभव प्रमाणपत्र ७) फोटो असलेले ओळखपत्र ८) रहिवाशी दाखला ९) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी अलीकडील काळातील पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला फोटो चिकटवावा. असाच आणखी एक स्वसाक्षांकित केलेला फोटो अर्जासोबत जोडावा.
उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application for the post of_______” असे लिहिणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकित केलेल्या प्रती निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक.
अर्ज करण्याचा पत्ता – The Registrar, National Institute of Plant Health Management, Rajendranagar, Hyderabad 500030, Telangana अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक- दि. ०५ मार्च २०२४