इंडियन कोस्टगार्डः२६० नाविक पदांच्या भरतीसाठी १२ वी उत्तीर्ण पुरुष उमेदवारांकडून दि. २४ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
* नाविक (जनरल ड्युटी) *
१) अभ्यासक्रमाचे नाव – नाविक (जनरल ड्युटी) (पुरुष)
पदसंख्या – २६० (ओपन १०२, ईडब्ल्यूएस २६, ओबीसी ५७, अजा २८, अज ४७)
विभागानुसार पदविभागणी –
• वेस्ट झोन – ६६ (ओपन २६, ईडब्ल्यूएस ७, ओबीसी १४, अजा १२, अज ७)
● नॉर्थ झोन – ७९ (ओपन ३१, ईडब्ल्यूएस ८, ओबीसी १७, अजा १४, अज ८)
• नॉर्थ ईस्ट झोन – ६८ (ओपन २७, ईडब्ल्युएस ७, ओबीसी १५, अजा १२, अज ७)
• ईस्ट झोन – ३३ (ओपन १३, ईडब्ल्युएस ३, ओबीसी ७, अजा ६, अज ४)
• नॉर्थ वेस्ट झोन – १२ (ओपन ५, ईडब्ल्युएस १, ओबीसी ३, अजा २, अज १)
• अंदमान अॅण्ड निकोबार – ३ (ओबीसी १, अजा १, अज १)
पात्रता – उमेदवार गणित व फिजिक्स विषयासह १२ वी सायन्स उत्तीर्ण असावा (टक्केवारीची अट नाही)
शारीरिक पात्रता – उंची कमीत कमी १५७ सें.मी. , छाती योग्य प्रमाणात असावी आणि ५ सें.मी. फुगणे आवश्यक. उमेदवाराचे वजन उंची आणि वयाच्या प्रमाणात असावे. (वजन १०% कमी/अधिक स्वीकारले जाईल.) श्रवणेक्षमता सामान्य असावी. उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदरुस्त असावा. अपंग उमेदवार अर्ज करण्यास अपात्र उमेदवारास दृष्टीदोष, तिरळेपणा, रातांधळेपणा, वर्णांधपणा, गुडघ्यास गुडघा लागणे, सपाट तळवे, त्वचारोग, तटतटलेल्य शिरा, छातीचे रोग नसावेत.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २२ वर्षापर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ सप्टेंबर २००२ ते ३१ ऑगस्ट २००६ (दोन्ही दिवस धरुन) दरम्यान झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना नाविक (जनरल ड्युटी) साठी ₹ ५२००-२०२००/- + ग्रेड पे ₹२०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय कोस्टगार्डचे सर्व आकर्षक भत्ते प्रदान केले जातील. तसेच जहाजावर मोफत जेवण, राहणे, प्रवासखर्च, स्वत:साठी तसेच कुटुंबासाठी वैद्यकीय मोफत सेवा, निवृत्तीवेतन, भविष्यनिर्वाह निधी, रजा इ. सर्व त्या आकर्षक सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. लेखी परीक्षेमध्ये २ विभाग असतील. पहिला विभाग ६० प्रश्न, ६० गुणांचा आणि ४५ मिनिटे कालावधीचा असेल यामध्ये गणित (२० प्रश्न, २० गुण), विज्ञान (१० प्रश्न, १० गुण), इंग्रजी (१५ प्रश्न, १५ गुण), बुद्धीमत्ता (१० प्रश्न, १० गुण), सामान्य ज्ञान (५ प्रश्न, ५ गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. यामध्ये ओपन/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ओबीसी उमेदवारांनी ३० गुण तर अजा/अज उमेदवारांनी २७ गुण मिळविणे आवश्यक. . तर दुसरा विभाग ५० प्रश्न, ५० गुणांचा आणि ३० मिनिटे कालावधीचा असेल. यामध्ये नाविक (जनरल ड्युटी) साठी गणित (२५ प्रश्न, २५ गुण), फिजिक्स (२५ प्रश्न, २५ गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. यामध्ये ओपन/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/ओबीसी उमेदवारांनी २० गुण तर अजा/अज उमेदवारांनी १७ गुण मिळविणे आवश्यक लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये १.६ कि.मी. धाव ७ मिनिटात पूर्ण करणे, २० उठक-बैठक आणि १० पुश अप्स या चाचण्या घेतल्या जातील. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. लेखी परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ आणि स्वसाक्षांकित केलेल्या प्रतींसह उपस्थित राहणे आवश्यक. परीक्षेसाठी उमेदवारांनी २ ते ३ दिवस राहण्याच्या तयारीने जावे. निवडीसाठी येणाऱ्या अजा/अज उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
प्रवेशपत्राबाबत- उमेदवारांना प्रवेशपत्र ई-मेल तसेच वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले जाईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्राच्या रंगीत प्रतीसह सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
प्रशिक्षण – निवड झालेल्या उमेदवारांना INS चिल्का येथे प्रशिक्षणासाठी पाठविले जाईल. हे प्रशिक्षण सप्टेंबर २०२४ मध्ये सुरु होईल. प्रशिक्षणाचा सर्व खर्च कोस्टगार्ड करेल. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना सी ट्रेनिंग आणि प्रोफेशनल ट्रेनिंगही दिले जाईल.
परीक्षा दिनांक – लेखी परीक्षा एप्रिल २०२४ मध्ये घेतली जाईल तर शारीरिक क्षमता चाचणी व इतर निवड चाचणी मे २०२४ मध्ये घेतली जाईल.,
बढतीच्या संधी – उमेदवारांना प्रधान सहायक इंजिनिअर पदापर्यंत बढती दिली जाईल.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹३००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/ क्रेडीट कार्ड/ डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अशी परीक्षा फी भरण्याची सुविधा नोकरी संदर्भ कार्यालयामध्ये उपलब्ध. अजा/अज उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी joinindiancoastguard.cdac.in या वेबसाईटवरून दि. १३ फेब्रुवारी २०२४ ते २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला ) अलीकडील काळात काढलेला फोटो (उमेदवारांनी फोटो काढताना काळ्या पाटीवर स्वत:चे नाव आणि फोटो काढलेला दिनांक कॅपीटल अक्षरात पांढऱ्या खडूने लिहिणे आवश्यक), काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताचा अंगठा व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. किंवा चलनाची प्रिंट काढून अॅक्सीस बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. उमेदवारांची अर्जाची रंगीत प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) अलीकडील काळात काढलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (उमेदवारांनी फोटो काढताना काळ्या पाटीवर स्वत:चे नाव आणि फोटो काढलेला दिनांक कॅपीटल अक्षरात पांढऱ्या खडूने लिहिणे आवश्यक)२) सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा ३) १० वी प्रमाणपत्र ४) १२ वी गुणपत्र ५) इंजि. डिप्लोमा गुणपत्रे ६) उमेदवार १८ वर्षाखालील असल्यास पालकांची सही ७) आधारकार्ड ८) स्वहस्ताक्षरामधील डिक्लरेशन ९) जातीचा दाखला
उमेदवारांनी कागदपत्रे तपासणीवेळी ऑनलाईन अर्जाच्या रंगीत प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व प्रत्येकी ३-३ स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे ३० फोटो तसेच निळी बॅकग्राऊंड असलेले १० फोटो, १७ वर्षांच्या आतील पाल्यांनी पालकांचे संमती प्रमाणपत्र, असल्यास एन.सी.सी. प्रमाणपत्राची मुळ प्रत व ४ स्वसाक्षांकित प्रती, एअरफोर्समधील सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलांनी तसे प्रमाणपत्र / डिस्चार्ज बुक आणि त्याच्या ४ स्वसांक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी joinindiancoastguard.cdac.in किंवा www.joinindiancoastguard.gov.in ही वेबसाईट पाहावी.
महत्वाचे दिनांक – अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. २७ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत.