Defense Services, Pune: Soldiers etc. : 10th - govtjobsu.com

Defense Services, Pune: Soldiers etc. : 10th

omkar
3 Min Read

संरक्षण सेवा, पुणे : शिपाई/ एमटीएस इ. पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०२ मार्च २०२४पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – एमटीएस (मेसेंजर)

पदसंख्या – ईडब्ल्युएस २

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – प्युन (शिपाई)

पदसंख्या – २ (ओपन १, ईडब्ल्युएस १)

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.

 

वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹१८,००० – ५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व प्रकारच्या सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

वयोमर्यादा – दि. ०२ मार्च २०२४ रोजी ओपन उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षापर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे सवलत, शासकीय कर्मचाऱ्यांना वयामध्ये ४० वर्षापर्यंत तर माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित 1 धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० प्रश्न, १०० गुणांची आणि ९० मिनिटे कालावधीची असेल. लेखीपरीक्षेमध्ये बुद्धीमत्ता (२५ प्रश्न- २५ गुण), अंकगणित (२५ प्रश्न-२५ गुण), इंग्रजी भाषा (२५ प्रश्न- २५ गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न-२५ गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जाईल. लेखी परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई – मेल आणि एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधाराकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक, उमेदवारांनी www.afmc.nic.in या वेबसाईटवरून दि.०२ मार्च २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळात काढलेला रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती स्कॅन करुन अपलोड कराव्यात व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी परीक्षा फी भेल्यानंतर परीक्षा फी ई-रीसीट आणि अर्जाची प्रिंटांऊट प्राप्त होईल. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करून ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित कोणत्याही पत्त्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळात काढलेला रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) जातीचा दाखला ५) अपंग असल्यास तसा दाखला ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र

निवडीच्या वेळी वरील प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.afmc.nic.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि.०२ मार्च २०२४

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *