नॅशनल इन्स्टीट्युट क्लार्क, ड्रायव्हर २०२४  - govtjobsu.com

नॅशनल इन्स्टीट्युट क्लार्क, ड्रायव्हर २०२४ 

omkar
4 Min Read

नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी : क्लार्क, ड्रायव्हर इ. पदांसाठी १० वी / १२ वी / पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १७ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे. 

 

१) पदाचे नाव – सिनिअर रिसर्च असिस्टंट

पदसंख्या – (ओपन १, ओबीसी १, अजा १)

पात्रता – उमेदवार इंजि पदवी (सिव्हील/कॉम्प्युटर इंजि.) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार उच्चपदवी (फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथेमॅटीक्स/हायड्रोलॉजी/कॉम्प्युटर अँप्लीकेशन्स/अर्थ सायन्स) उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – टेक्निशिअन ग्रेड ।।

पदसंख्या – (ओपन १, ओबीसी १, अजा १)

पात्रता – उमेदवार १२ वी सायन्स उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार आयटीआय (इलेक्ट्रीशिअन/कॉम्प्युटर ऑपरेटर/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/एअर कंडीशनिंग/हॉर्टीकल्चर) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

३) पदाचे नाव – लोअर डिव्हीजन क्लार्क

पदसंख्या – (ओपन २, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २)

पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. टायपिंग गती इंग्रजी ३५ शप्रमी किंवा हिंदी ३० शप्रेमी आवश्यक.

 

४) पदाचे नाव – स्टाफ कार ड्रायव्हर

पदसंख्या  – (ओपन १, ओबीसी १)

पात्रता – उमेदवार ०८ वी उत्तीर्ण असावा. जड /हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक. वाहन दुरुस्तीचे प्राथमिक ज्ञान आवश्यक. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

वयोमर्यादा – दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी पद क्रमांक १ साठी ओपन उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षापर्यंत, पद क्रमांक २ व ३ साठी १८ ते २७ वर्षापर्यंत तर पद क्रमांक ४ साठी १८ ते २५ वर्षापर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे तर अजा उमेदवारांना ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/अज अपंग १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयामध्ये नियमाप्रमाणे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी रु.४४९००१,४२,४००/-, पद क्रमांक २ साठी रु.२१,७००-६९,१००/तर पद क्रमांक ३ व ४ साठी रु.१९९००-६३२००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा फी – उमेदवारांना परीक्षा फी रु.१०० अशी परीक्षा फी असून ती National Institute of Hydrology, Roorkee यांच्या नावे पेयेबल अँट Roorkee अशी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेच्या डी.डी. स्वरुपात अर्जासोबत जोडावी. अजा/अज/अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. प्रवेशपत्रा सोबत मूळ प्रमाणपत्रे व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यातील अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त रजिस्टर/स्पिड पोस्टाने पाठवावेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) परीक्षा फी डी.डी २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) अनुभव असल्यास तसा दाखला ५) जातीचे प्रमाणपत्र ६) ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ७) रहिवासी दाखला ८) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकीत केलेला फोटो चिकटवावा. असेच आणखी ३ फोटो अर्जासोबत जोडावेत.

उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात व मुळ प्रती कागदपत्रे तपासणी वेळी सादर कराव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF_______________” असे लिहावे. (उमेदवारांनी फक्त A4 आकाराच्या लिफाफ्यातून अर्ज करावेत) शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचारी/महामंडळातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत व ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अर्जासोबत जोडावे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Senior Administrative Officer, National Institute of Hydrolog, Jalvigyan Bhawanm Roorkee 247667, Distt. Haridwar (Uttarakhand)

 

अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – १७ सप्टेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *