महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लिमिटेड मुंबई : कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – कनिष्ठ लिपिक
पदसंख्या – १२
पदभरतीचे ठिकाण – जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे
पात्रता – उमेदवार किमान ५०% गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संगणक हाताळणी/वापराबाबतचे नमुद केलेले महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ यांचे अधिकृत MS-CIT किंवा DOEACC सोसायटीच्या CCC किंवा O/A/ B स्तरापैकी कोणत्याही एका परीक्षेचे प्रमाणपत्र असणे आवश्यक. उमेदवार B.C.A/B.C.M/M.C.M/B.E/ B.Tech उत्तीर्ण असल्यास संगणक हाताळणी/वापराबाबतचे प्रमाणपत्र शिथिल केले जाईल.
वयोमर्यादा – दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय २२ ते ३५ वर्षांपर्यंत असावे.
वेतनश्रेणी – उमेदवारांना २०,७६०/- द.म. अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराची वय, पात्रता, अनुभव दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची १२० प्रश्न – १०० गुणांची व १२० मिनिटे कालावधीची लेखी परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये अंकगणित (४० प्रश्न-४० गुण), इंग्रजी भाषा आणि व्याकरण (२० प्रश्न१० गुणे), संगणक आणि सहकार ज्ञान (२० प्रश्न- १० गुणे), बौधिक चाचणी (२० प्रश्न-२० गुण) आणि बँकींग आणि सामान्य ज्ञान (२० प्रश्न-२० गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि मराठी असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
ऑनलाईन परीक्षा केंद्र – जळगाव
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना निवडीचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल/एम.एम.एस. द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना रु.११८०/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग / क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.mucbf.in या वेबसाईटवरून दि. ०७ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फिकट बॅकग्राऊंड असलेला रंगीत फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड), काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व डिक्लरेशन आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा फिकट बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड) रंगीत फोटो, सही व डिक्लरेशन २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपतत्र
उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, असल्यास एमप्लॉयमेंट कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र, दिव्यांग(अपंग) असल्यास तसा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.mucbf.in ही वेबसाईट पाहावी.
अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ०७ सप्टेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *