पश्चिम रेल्वे, मुंबई : खेळाडू भरतीसाठी १० वी / १२ वी/पदवी उत्तीर्ण खेळाडू उमेदवारांकडून दिनांक १४ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदसंख्या – ६४, वेतनश्रेणी, क्रिडा प्रकार व पदविभागणी
वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००/२८००,
एकुण पदसंख्या – ५
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी –
बास्केटबॉल (महिला) – ऑलराऊंडर, पदसंख्या – १
क्रिकेट (पुरुष) – बॅट्समन/स्पिन बॉलर/फास्ट बॉलर/ऑल राऊंडर , पदसंख्या – १
क्रिकेट (महिला) – बॅट्समन/स्पिन बॉलर/पेस ऑल राऊंडर, पदसंख्या – १
रेसलिंग फ्रि स्टाईल (महिला) – ५० किग्रॅ/५५ किग्रॅ/५७ किग्रॅ/ ५९ किग्रॅ/६२ किग्रॅ/६५ किग्रॅ/७२ किग्रॅ, पदसंख्या – १
रेसलिंग फ्रि स्टाईल (पुरुष) – ५५ किग्रॅ / ६० किग्रॅ / १३० किग्रॅ, पदसंख्या – १
वेतनश्रेणी – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/२०००
एकुण पदसंख्या – १६,
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी –
क्रिकेट (पुरुष) – बॅट्समन / स्पिन बॉलर/फास्ट बॉलर/ऑल राऊंडर, पदसंख्या – ३
क्रिकेट (महिला) – बॅट्समन/स्पिन बॉलर/पेस ऑल राऊंडर, पदसंख्या – २
कब्बडी (पुरुष) – ऑल राऊंडर, पदसंख्या – २
टेबल टेनिस (पुरुष) – सिंगल/डबल/टीम, पदसंख्या – १
टेबल टेनिस (महिला) – सिंगल/डबल/टीम, पदसंख्या – १
रेसलिंग (महिला) (फ्रि स्टाईल) – ५० किग्रॅ /५५ किग्रॅ /५७ किग्रॅ/५९ किग्रॅ/६२ किग्रॅ/६५ किग्रॅ/७२ किग्रॅ, पदसंख्या – ३
रेसलिंग (पुरुष) (ग्रीको रोमन) – ५५ किग्रॅ/६० किग्रॅ/१३० किग्रॅ, पदसंख्या – १ ,
वेटलिफ्टींग (महिला) – ४५ किग्रॅ /४९ किग्रॅ / ५५ किग्रॅ / ७६ किग्रॅ, पदसंख्या – २
वेतनश्रेणीनुसार पदसंख्या – रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१८००
एकुण पदसंख्या – ४३,
क्रिडाप्रकारानुसार पदविभागणी –
१) अँथलेटीक्स (पुरुष) – ४०० मी/१५०० मी/जॅव्हलीन थ्रो, पदसंख्या – २
२) अँथलेटीक्स (महिला) – १०० मी/४०० मी/जॅव्हलीन थ्रो, पदसंख्या – २
३) बास्केटबॉल (पुरुष) – शुटींग गार्ड/सेंटर (पोस्ट प्लेअर), पदसंख्या – २
४) बॉडी बिल्डींग (पुरुष) – ५५ किग्रॅ/६० किग्रॅ /७० किग्रॅ /७५ किग्रॅ / ८० किग्रॅ, पदसंख्या – ३
५) सायकलिंग (पुरुष) – इंडी. टाईम ट्रायल / रोड रेस / क्रिटेरीअम रेस, पदसंख्या – ५
६) हॉकी (पुरुष) – फॉरवर्ड/गोलकिपर/डिफेंडर/ड्रॅग फ्लिकर/ ‘ मिडफिल्डर, पदसंख्या – ५
७) हॉकी (महिला) – मिडफिल्डर/स्ट्राईकर/लेफ्ट फिल्डर, पदसंख्या – ३
८) हॅण्डबॉल (पुरुष) – लेफ्टविंग/लेफ्ट बॅक / सेंटर बॅक / ऑल राऊंडर, पदसंख्या – ३
९) हॅण्डबॉल (महिला) – लेफ्टविंग/लेफ्ट बॅक/सेंटर बॅक / ऑल राऊंडर, पदसंख्या – ४
१०) खो-खो (महिला) – ऑल राऊंडर, पदसंख्या – ५
११) पॉवर लिफ्टींग (पुरुष) – ६६ किग्रॅ/७४ किग्रॅ, पदसंख्या – १
वेतनश्रेणीनुसार शैक्षणिक पात्रता आणि क्रिडा पात्रता –
रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.२४००/२८०० –
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.
क्रिडा पात्रता – ऑलंपिक गेम (सिनिअर) मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. किंवा वर्ल्ड कप (ज्युनिअर/ सिनिअर)/वर्ल्ड चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर)/ एशियन गेम्स (सिनिअर)/ कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये किमान ३ रे स्थान पटकाविलेले असावे.
रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१९००/२००० –
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा. टक्केवारीची अट नाही.
क्रिडा पात्रता – वर्ल्डकप (ज्युनिअर/ सिनिअर), वर्ल्ड चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर), एशियन गेम्स (सिनिअर) किंवा कॉमन वेल्थ (सिनिअर) यामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे किंवा कॉमन वेल्थ चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर)/ एशियन चॅम्पियनशीप/ एशियन कप (ज्युनिअर/ सिनिअर)/ साऊथ एशियन फेडरेशन गेम्स (सिनिअर) /USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशीप (सिनिअर) मध्ये किमान ३ रे स्थान प्राप्त झालेले असावे. किंवा सिनिअर/युथ / ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशीपमध्ये राज्याचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान पटकाविलेले असावे किंवा राष्ट्रीय खेळांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करुन किमान ३ रे स्थान पटकावलेले असावे किंवा ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पीयनशीपमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करून किमान तिसरे स्थान पटकाविलेले असावे किंवा फेडरेशन कप सिनिअर गटात राज्यस्तरावर प्रथम स्थान पटकाविलेले असावे.
रु.५२००-२०२०० ग्रेड पे रु.१८०० –
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १० वी / आयटीआय/डिप्लोमा उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हताधारक असावा. टक्केवारीची अट नाही.
क्रिडा पात्रता – कॉमन वेल्थ चॅम्पिशयनशिप (ज्युनिअर/ सिनिअर)/ एशियन चॅम्पियनशीप / एशियन कप (ज्युनिअर/ सिनिअर)/ साऊथ एशियन फेडरेशन गेम्स (सिनिअर) /USIC (वर्ल्ड रेल्वे) चॅम्पीयशनशीप (सिनिअर) यामध्ये देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असावे किंवा राष्ट्रीय खेळांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करुन किमान ८ वे स्थान पटकावलेले असावे किंवा फेडरेशन कप सिनिअर गटात राज्यस्तरावर तिसरे स्थान पटकाविलेले असावे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. १ जानेवारी २०२५ रोजी १८ ते २५ या दरम्यान असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००० आणि १ जानेवारी २००७ (दोन्ही दिवस धरुन) झालेला असावा.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) ०१ एप्रिल २०२२ पासूनची क्रिडा पात्रता पात्र झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड एकूण १०० गुणांची असून त्यांमध्ये खेळाचे कौशल्य,शारीरीक तंदुरुस्ती, प्रशिक्षक चाचण्या यावर ४० गुण (यामध्ये किमान २५ गुण मिळविणे आवश्यक), संबंधीत क्रिडा पात्रता ५० गुण तसेच शैक्षणिक पात्रता १० गुण या गुणांवर आधारीत निवड केली जाईल. वेतनश्रेणी ५२००-२०२०० + ग्रेड पे १८०० साठी किमान ६० गुण, वेतनश्रेणी ५२००-२०२००+ ग्रेड पे १९००/२००० साठी किमान ६५ गुण तर ५२००-२०२०० + ग्रेड पे २४००/२८०० साठी किमान ७० गुण मिळविणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. निवडीच्यावेळी उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व प्रमाणपत्रांच्या २-२ स्वः साक्षांकित प्रती तसेच मुळ प्रतींसह उपस्थित राहणे आवश्यक. येताना स्वत:चे Sports Kit आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणणे आवश्यक. पात्र उमेदवारांनाच कॉल लेटर्स पाठविले जातील.परीक्षेच्या ठिकाणी २-३ दिवस राहण्याची व्यवस्था उमेदवारास स्वतःच करावी लागेल. तसेच परीक्षेसाठी उमेदवारांनी स्व:खर्चाने उपस्थित राहणे आवश्यक. अजा/अज उमेदवारांना नियमानुसार प्रवासखर्च दिला जाईल.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांना परीक्षा फी रु.५००/ – तर अल्पसंख्याक/आर्थिकदृष्ट्या मागास/अजा/अज / माजी सैनिक/महिला उमेदवारांना परीक्षा फी रु.२५०/- अशी असून ती नेटबँकींग/क्रेडीट कार्ड/डेबीट कार्ड द्वारे भरणे आवश्यक.
महत्वाची सुचना – निवडीसाठी उपस्थित राहणाऱ्या ओपन / ओबीसी उमेदवारांना रु.४००/- तर अजा / अज / महिला / मा.सैनिक/ अल्पसंख्याक / आर्थिक दृष्ट्या मागास उमेदवारांना रु.२५०/- परीक्षा फी त्यांच्या बँक खात्यावर परत करण्यात
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी www.rrc-wr.com या वेबसाईटवरुन दि. १६ ऑगस्ट २०२४ ते १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करणेपूर्वी उमेदवारांकडे वैध ईमेल आयडी असणे आवश्यक. नसेल तर नवीन वैध ईमेल आयडी प्राप्त करावा. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन अर्जामध्ये स्वत:चा तपशील भरावा तसेच फोटो व सही तसेच आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती स्कॅन करुन अपलोड कराव्यात व अर्ज काळजीपूर्वक वाचुन सबमिट करावा. त्यानंतर नेटबँकींग/क्रेडीटकार्ड/डेबीटकार्ड द्वारे परीक्षा फी भरावी. प्राप्त होणारा रजि.नंबर लिहून ठेवावा.त्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे गुणपत्रे ३) जातीचे प्रमाणपत्र ४) खेळाचे प्रमाणपत्र ५) आधार क्रमांक / आधार नोंदणी क्रमांक ६) मा.सैनिक/ अल्पसंख्याक /आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास तसे प्रमाणपत्र ७) बँक पासबुक
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट व प्रवेशपत्र, फोटो असलेले ओळखपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्व-साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. तसेच २ पासपोर्ट आकाराचे फोटो (फोटोच्या पाठीमागे सही करावी) सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय निमशासकीय मंडळामधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत. तसेच निवडीच्या वेळेस ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.rrcwr.com ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – १६ ऑगस्ट २०२४ ते १४ सप्टेंबर २०२४