नॅशनल इन्स्टीट्युट, दिल्ली : क्लार्क २०२४  - govtjobsu.com

नॅशनल इन्स्टीट्युट, दिल्ली : क्लार्क २०२४ 

omkar
4 Min Read

नॅशनल इन्स्ट्युट ऑफ एज्युकेशनल प्लानिंग अँण्ड अँडमिनिस्ट्रेशन : असिस्टंट, क्लार्क पदांसाठी १२ वी / पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०९ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – असिस्टंट

पदसंख्या – (ओपन २, अजा १)

पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.

 

२) पदाचे नाव – लोअर डिव्हीजन क्लार्क

पदसंख्या – १० (ओपन ४, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २) उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा.

पात्रता – संगणकावर टायपिंग गती इंग्रजी ३० शप्रमी किंवा हिंदी ३५ शप्रमी आवश्यक.

 

वयोमर्यादा – दि. ०९ ऑगस्ट २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय पद क्रमांक १ साठी ३० वर्षापर्यंत तर पद क्रमांक २ साठी १८ ते २७ वर्षापर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात ५ वर्षे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ साठी रु. ३५,४००१,१२,४००/- तर पद क्रमांक २ साठी रु. १९,९००-६३,२००/ अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी –  पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि स्कीलटेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षे मधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावे. लेखी परीक्षेच्यावेळी सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी रु. १०००/-, तर अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी रु. ५००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/ क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.nepa.ac.in या वेबसाईटवरून दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकराऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, विहित नमुन्यातील डिक्लरेशन स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकराऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो व सही विहित नमुन्यातील डिक्लरेशन २) सर्व शैक्षणिक/ व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्र ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) आधारकार्ड उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.niepa.ac.in ही वेबसाईट पाहावी.

 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ०९ ऑगस्ट २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *