MSEB : ७१८ असिस्टंट इंजिनिअर्स : इंजि. पदवी २०२४ - govtjobsu.com

MSEB : ७१८ असिस्टंट इंजिनिअर्स : इंजि. पदवी २०२४

omkar
9 Min Read

MSEB : ७१८ असिस्टंट इंजिनिअर्स इ. पदांसाठी इंजि. पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०९ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – असिस्टंट इंजिनिअर (ट्रान्समिशन)

पदसंख्या – ४१९ (ओपन ११३ पैकी महिला ३४, खेळाडू ६, इतर ७३, ईडब्ल्यूएस ४२ पैकी महिला १३, खेळाडू २, इतर २७, एसईबीसी ४२ पैकी महिला १३, खेळाडू २, इतर २७, ओबीसी ९१ पैकी महिला २७, खेळाडू ५, इतर ५९, अजा ५० पैकी महिला १५, खेळाडू ३. इतर ३२ ३२ महिला १० खेळाडू २, इतर २० विजाअ १३ पैकी महिला ४, खेळाडू १, इतर ८, भजब १० पैकी महिला ३, खेळाडू १, इतर ६, भजक १४ पैकी महिला ४, खेळाडू १, इतर ९, भजड ७ पैकी महिला २, इतर ५, विमाप्र ५ पैकी महिला २, इतर ३) पैकी अपंग १७ (कर्णबधीर ५, अस्थिव्यंग ४, बहुविध अपंगत्व ८), अनाथ ४

पात्रता – उमेदवार इंजि पदवी (इलेक्ट्रीकल इंजि/टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नहीं.

 

२) पदाचे नाव – असिस्टंट इंजिनिअर (टेलिकम्युनिकेशन)

पदसंख्या – ९ (ओपन ६ पैकी महिला २, इतर ४, ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, अजा १)

पात्रता – उमेदवार बीई/बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलीकम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.४९२१०-२१६५-६००३५-२२८०-११९३१५/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

 

३) पदाचे नाव – डेप्युटी एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर (ट्रान्समिशन)

पदसंख्या – १३२ (ओपन ३१ पैकी महिला ९, खेळाडू २, इतर २०, ईडब्ल्यूएस १४ पैकी महिला ४, खेळाडू १, इतर ९, एसईबीसी १४ पैकी महिला ४, खेळाडू १, इतर ९, ओबीसी २६ पैकी महिला ८, खेळाडू १. इतर १४, अजा १६ पैकी महिला ५. खेळाडू १, इतर १०, अज १२ पैकी महिला ४, खेळाडू १, इतर ७, विजाअ ५ पैकी महिला २, इतर ३, भजब ३ पैकी महिला १, इतर २, भजक ६ पैकी महिला २, इतर ४, भजड ३ पैकी महिला १, इतर २, विमाप्र २ पैकी महिला १, इतर १) पैकी अपंग ५ कर्णबधीर २, अस्थिव्यं १, बहुविध अपंगत्व २) अनाथ १

पात्रता – उमेदवार इंजि पदवी (इलेक्ट्रीकल इंजि/टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.६१८३०-२५१५-७४४०५-२७३०-१३९९२५/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

 

४) पदाचे नाव – अँडीशनल एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर ( ट्रान्समिशन)

पदसंख्या – १३३ (ओपन २६ पैकी महिला ८, खेळाडू १, इतर १७, ईडब्ल्यूएस १३ पैकी महिला ४, खेळाडू १, इतर ८, एसईबीसी १३ पैकी महिला ४, खेळाडू १. इतर ८, ओबीसी २९ पैकी महिला ९, खेळाडू १, इतर १९, अजा २० पैकी महिला ६, खेळाडू १, इतर १३, अज १२ पैकी महिला ४, खेळाडू १, इतर ७, विजाअ २ पैकी महिला १, इतर १, भजब ५ पैकी महिला २, इतर ३, भजक ७ पैकी महिला २, इतर ५, भजड ३ पैकी महिला १, इतर २, विमाप्र ३ पैकी महिला १, इतर २) पैकी अपंग ५ (कर्णबधीर २, अस्थिव्यंग १, बहुविध अपंगत्व २). अनाथ १

पात्रता – उमेदवार इंजि पदवी (इलेक्ट्रीकल इंजि/टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. संबंधित कामाचा ७ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.६८७८०-२७३०-८२४३०-२९००- १५४९३०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

 

५) पदाचे नाव – एक्झीक्युटीव्ह इंजिनिअर (ट्रान्समिशन)

पदसंख्या – २५ (ओपन ८ पैकी महिला २, इतर ६ ईडब्ल्यूएस ३ पैकी महिला १, इतर २, एसईबीसी ३ पैकी महिला १, इतर २. ओबीसी ५ पैकी महिला २, इतर ३, अजा ३ पैकी महिला १, इतर २, अज १, विजाअ १, भजड १) पैकी कर्णबधीर १

पात्रता – उमेदवार इंजि पदवी (इलेक्ट्रीकल इंजि/टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. संबंधित कामाचा ९ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.८१६९५-३१४५-९७४२०-३५७०-१७५९६०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

 

वयोमर्यादा – दि. ३१ जुलै २०२४ रोजी पद क्रमांक १ ते ३ ओपन उमेदवाराचे ३८ वर्षांपर्यंत असावे. पदक्रमांक ४ व ५ साठी उमेदवारांना ४० वर्षांपर्यंत सवलत, मागासवर्गीय उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग उमेदवारांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. खेळाडू उमेदवारांना वयात ४३ वर्षांपर्यंत सवलत, विभागीय उमेदवारांना वयात ५७ वर्षांपर्यंत सवलत.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ३१ जुलै २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. ४) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. ५) प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची क्रिडाविषयक प्रमाणपत्रे योग्य दर्जाची असल्याबाबत व ते खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याबाबत, सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अर्ज सादर करण्यापूर्वी प्राप्त करणे आवश्यक आहे.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करून त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १३० प्रश्न, १५० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. यामध्ये संबंधित विषयाचे ज्ञान (५० प्रश्न, ११० गुण), बुद्धीमत्ता (४० प्रश्न, २० गुण), अंकगणित (२० प्रश्न, १० गुण), मराठी भाषा (२० प्रश्न, १० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ऑनलाईन परीक्षेमध्ये ओपन उमेदवारांनी ३० % तर मागासवर्गीय उमेदवारांनी २० % गुण मिळविणे आवश्यक, ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

ऑनलाईन परीक्षा दिनांक – ऑगस्ट/ सप्टेंबर २०२४

पद क्रमांक १ व २ साठी लेखी परीक्षा केंद्र – कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, मुंबई/नवी मुंबई/ठाणे/ बृहन्मुंबई, अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई-मेल / एस.एम.एसद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेच्या १० दिवस आधी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले मुळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी रु.७००/- तर मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी रु.३५०/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https:// www.mahatransco.in/ या वेबसाईटवरून दि. ०९ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वतःजवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, विहित नमुन्यातील डिक्लरेशन स्कॅन करुन अपलोड करावी. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा, विहित नमुन्यातील डिक्लरेशन स्कॅन ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ४) आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, ओबीसी, विजाअ, भजब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, अंशकालीन उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, अनाथ असल्यास तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी https:// www.mahatransco.in/ ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ०९ ऑगस्ट २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *