MSEB : ६०४ तंत्रज्ञ पदांसाठी आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०९ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – तंत्रज्ञ २ (पारेषण प्रणाली)
पदसंख्या – २९३ (ओपन ८३ पैकी महिला २३, माजी सैनिक ११. इतर ४९, ईडब्ल्यूएस २७ पैकी महिला १२, इतर १५, एसईबीसी २८ पैकी महिला १२, इतर १६, ओबीसी ५० पैकी महिला १६, माजी सैनिक ८, इतर २६, अजा ४१ पैकी महिला १२, माजी सैनिक १, इतर २८, अज २१ पैकी महिला ८, इतर १३, विजाअ १५, भजब ११, भजक ९, भजड ८) पैकी अपंग १४ (कर्णबधीर १४)
शैक्षणिक पात्रता – शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वजितंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा उमेदवार १० वी आणि आय.टी.आय (वीजतंत्री) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक असावा तसेच संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु. २९०३५ – ७२८७५/- अशी वेतनश्रेणी अदा केले जाईल.
२) पदाचे नाव – तंत्रज्ञ १ (पारेषण प्रणाली)
पदसंख्या – १८५ (ओपन ५५ पैकी महिला १६, माजी सैनिक ७, इतर ३२, ईडब्ल्यूएस १७ पैकी महिला ५, इतर १२, एसईबीसी १८ पैकी महिला ५, इतर १३, ओबीसी ३३ पैकी महिला १२, माजी सैनिक २, इतर १९, अजा २४ पैकी महिला १०, इतर १४, अज १२, विजाअ १०, भजब १२, भजक ४) पैकी अपंग १२ (कर्णबधीर १२)
शैक्षणिक पात्रता – शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वजितंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक किंवा उमेदवार १० वी आणि आय.टी.आय (वीजतंत्री) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्रधारक असावा तसेच संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु. २९९३५-८२४३०/- अशी वेतनश्रेणी अदा केले जाईल.
वयोमर्यादा – दि. ३१ जुलै २०२४ रोजी उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय व खेळाडू उमेदवारांना वयात ४३ वर्षापर्यंत सवलत. अपंग /अपंग माजी सैनिक/प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त/स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य/सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी यांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. अंशकालीन उमेदवारांना वयात ५५ वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिक उमेदवारांना वयामध्ये नियमानुसार सवलत.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ३१ जुलै २०२४ रोजीचा धरली जाईल. ३) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. ४) प्राविण्यप्राप्त खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची क्रिडाविषयक प्रमाणपत्रे योग्य दर्जाची असल्याबाबत व ते खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याबाबत, सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र अर्ज सादर करण्यापूर्वी प्राप्त करणे आवश्यक आहे. ५) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे पात्रता प्रमाणपत्र शासनाच्या आदेशाच्या दिनांकापासून किंवा या पदासाठी अर्ज करण्याच्या दिनांकापासून ०६ महिने यापैकी जो नंतरचा असेल त्या दिनांकापर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १३० प्रश्न, १५० गुणांची आणि १२० मिनिटे कालावधीची असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये संबंधित विषयाचे ज्ञान (५० प्रश्न११० गुण), बुद्धीमत्ता (४० प्रश्न- २० गुण), अंकगणित (२० प्रश्न१० गुण), मराठी भाषा (२० प्रश्न- १० गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले एक मुळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा केंद्रे – कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, अहमदनगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक
परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी रु. ६००/- तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु. ३००/- अशी परीक्षा फी अशी असून ती नेटबँकिंग / क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अपंग, माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.mahatransco.in या वेबसाईटवरून दि. ०९ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिकट बॅकग्राऊंड (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड) असलेला रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, विहित नमुन्यातील डिक्लरेशन स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वतःजवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिकट बॅकग्राऊंड (प्राधान्याने पांढरी बॅकग्राऊंड) असलेला रंगीत फोटो व सही, विहित नमुन्यातील डिक्लरेशन २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधारकार्ड ४) जातीचा दाखला ५) सेवायोजन कार्यालयाकडे नोंदणी असल्यास तसे प्रमाणपत्र ६) खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, एसईबीसी, ओबीसी, विजाअ, भजब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, अनाथ असल्यास तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.mahatransco.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ०९ ऑगस्ट २०२४