ITBP – इंडो तिबेटियन बॉर्डर : ५१ कॉन्स्टेबल ट्रेडस्मन (टेलर, कॉबलर) पदांसाठी १० वी /आय.टी.आय उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १८ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – कॉन्स्टेबल (टेलर),
पदसंख्या – १८ (ओपन ८ पैकी महिला १, इतर ७, ईडब्ल्यूएस २, अज ८ पैकी महिला १, इतर ७)
२) पदाचे नाव – कॉन्स्टेबल (cobbler-चांभार/मोची),
पदसंख्या – ३३ (ओपन १८ पैकी महिला ३, इतर १५, ईडब्ल्यूएस ३, अजा १, अज ११ पैकी महिला २, इतर ९),
पात्रता – पद क्र. १ व २ साठी उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. तसेच संबंधित कामाचा २ किमान वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार संबंधित ट्रेडमधील आयटीआय उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार २ वर्षांचा संबंधित ट्रेडमधील आयटीआय डिप्लोमा उत्तीर्ण असावा. स्वत:च्या उद्योगातील स्वःसाक्षांकित अनुभवाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जातील.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. १८ ऑगस्ट २०२४ रोजीचे धरले जाईल. पद क्र. १ व २ साठी उमेदवाराचे वय १८ ते २३ पर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. १९ ऑगस्ट २००१ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान (दोन्ही दिवस धरून) झालेला असावा. अजा/अज / दंगलग्रस्त/शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षे तर माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे वयात सवलत.
शारीरिक पात्रता |
|||
पुरूष उमेदवारांसाठी |
|||
जातीचे नाव |
उंची |
छाती |
|
न फुगवता |
फुगवून |
||
जनरल, ओबीसी, अजा |
१६७.५ सेंमी. | ८० सेंमी |
८५ सेंमी |
मराठा, डोग्राज इ. |
१६५ सेंमी. | ७८ सेंमी | ८३ सेंमी |
अज उमेदवार | १६२.५ सेंमी. | ७६ सेंमी |
८१ सेंमी |
महिला उमेदवारांसाठी |
||
जातीचे नाव |
उंची |
|
जनरल, ओबीसी, अजा |
१५७ सेंमी. | |
मराठा, डोग्राज इ. |
१५५ सेंमी. |
|
अज उमेदवार |
१५० सेंमी. |
वजन – वय आणि उंचीच्या प्रमाणात असावे.
दृष्टी – जवळची दृष्टी चांगला डोळा N ६ खराब डोळा N ९ आणि दुरदृष्टी चांगला डोळा ६/६ आणि खराब डोळा ६/९ . कलर व्हीजन CP IV. ज्या उमेदवारांना उंची व छातीच्या मोजमापात सवलत हवी असेल त्यांनी तसे प्रमाणपत्र निवडीच्या वेळी सादर करणे आवश्यक. गुडघ्याला गुडघे टेकणे, सपाट तळवे, शिरा तटतटलेल्या, रातांधळेपणा, रंगाधळेपणा, तिरळेपणा इत्यादी विकार असलेल्या उमेदवारांनी अर्ज करु नयेत. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.५,२००-२०,२००+ ग्रेड पे रु.२,०००/अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना इंडो तिबेटियन पोलिस दलाच्या सर्व सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. ५१ पदांपैकी १०% पदे माजी सैनिकांसाठी राखीव. अपंग उमेदवारांनी अर्ज करु नयेत.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.१०० असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/महिला/ मा.सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड शारीरिक मोजमाप चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी, ट्रेड टेस्ट आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. यामध्ये दोन फेज असतील. फेज १ मध्ये हाईट बार टेस्ट, शारिरीक क्षमता चाचणी, शारिरीक मोजमाप चाचणी व ट्रेड टेस्ट यांचा समावेश असेल. प्रथम उमेदवारांची हाईट बार टेस्ट घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची शारिररीक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी – १.६ कि.मी धाव ७.३० मिनिटांत पूर्ण करणे, लांब उडी – ११ फूट (३ संधी), उंच उडी ३१ १/२ फूट (३संधी) तर महिला उमेदवारांसाठी – ८०० मीटर धाव ४.४५ मिनिटांत पूर्ण करणे, लाब उडी – ९ फूट (३ संधी) आणि उंच उडी – ३ फूट (३ संधी) यांचा समावेश असेल. माजी सैनिकांची ही चाचणी घेतली जाणार नाही. शारिरीक क्षमता चाचणीमधील पात्र उमेदवारांची शारिरीक मोजमाप चाचणी घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची ५० गुणांची ट्रेड टेस्ट घेतली जाईल. यामध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. ट्रेड टेस्ट मध्ये पात्र होण्यासाठी ओपन व माजी सैनिक उमेदवारांनी किमान ५० % व ओबीसी/अजा/अज उमेदवारांनी किमान किमान ४० % गुण मिळविणे आवश्यक. फेज १ मधील पात्र उमेदवारांची फेज २ मध्ये ५० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १ तास कालावधीची लेखी परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये सामान्यज्ञान (१५ प्रश्न-१५ गुण), गणित (१० प्रश्न -१० गुण), बुद्धिमत्ता (१५ प्रश्न – १५ गुण) आणि हिंदी/ इंग्रजी भाषा (१० प्रश्न – १० गुण) यावर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असले. लेखी परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी ओपन व माजी सैनिक उमेदवारांनी किमान ३५ % व ओबीसी/अजा/अज उमेदवारांनी किमान किमान ३३ % गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षा व ट्रेड टेस्ट मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामधील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी व वैद्यकिय चाचणी करुन अंतिम निवड केली जाईल.
वैद्यकिय चाचणी बाबत – वैद्यकिय चाचणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार १५ दिवसांच्या आत पुर्नचाचणीसाठी विनंती अर्ज करु शकतात. मात्र यासाठी उमेदवारांनी मेडिकल सर्टिफिकेटसोबत रिजेक्शन स्लीप आणि रु.२५ अशी परीक्षा फी INSPECTOR GENERAL (NW) Frontier, ITB Police Force यांच्या नावे इंडियन पोस्टल ऑर्डर स्वरुपात जोडणे आवश्यक.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांना प्रवेशपत्र ई-मेल द्वारे/ वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र,/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे व २ ते ३ दिवस राहण्याच्या तयारीने यावे.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.recruitment.itbpolice.nic.in या वेबसाईटवरून दि. १८ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार कार्ड ४) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ५) जातीचा दाखला ६) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, डोमोसाईल प्रमाणपत्र, उंची व छातीमध्ये सवलत घेत असल्यास विहित नमुन्यातील प्रमाणपत्र व ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी www.recruitment.itbpolice.nic.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – दि. १८ ऑगस्ट २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *