इंडियन नेव्ही : इंडियन नेव्ही सिव्हिल एन्ट्रस टेस्ट : ७४१ ट्रेडस्मन मेट, चार्जमन्स, फायरमन इ. पदांसाठी १०वी/आय.टी.आय/डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०२ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ट्रेडस्मन मेट
एकूण पदसंख्या – १६१
विभागानुसार पदसंख्या
• वेस्टर्न नावल कमांड, मुंबई – १३५ (ओपन ५९, ईडब्ल्यूएस १२, ओबीसी ३६, अजा १९, अज ०९ ) पैकी माजी सैनिक १३, दिव्यांग (अपंग) ६, (कर्णबधीर १, अल्पदृष्टी २, अस्थिव्यंग १, बहुविध अपंग २)
• इस्टर्न नावल कमांड, विशाखापट्टणम – १५ (ओपन १०, ईडब्ल्यूएस १, अजा ४) पैकी दिव्यांग (अपंग) १ (अल्पदृष्टी १)
• साऊथर्न नावल कमांड, कोची – ११ (ओपन ५, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा १, अज १) पैकी दिव्यांग (अपंग) १, (अस्थिव्यंग १)
पात्रता – उमेदवार १० वी आणि आय.टी.आय उत्तीर्ण असावा.
आयटीआय ट्रेड – कार्पेटर/ सिव्हील इंजि. असिस्टंट / सेंट्रल एअर कंडीशनिंग प्लांट मेकॅनिक / कॉम्प्युटर हार्डवेअर अँण्ड नेटवर्क मेंटेनन्स / कॉम्प्युटर ऑपरेटर अँण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट/ कॉम्प्युटर एडेड एमब्रोयड्री अँण्ड डिझायनिंग/ कटींग अँण्ड सेविंग / डोमेस्टीक पेंटर/ ड्राफ्टसमन सिव्हील / ड्रेस मेकिंग/इलेक्ट्रीशिअन/ इलेक्ट्रीशिअन पॉवर डिस्ट्रीब्युशन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स / इलेक्ट्रोप्लेटर/ फिटर/ फौंड्रीमन/इंडस्ट्रीअल पेंटर/इन्फर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेन्स / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ इंटेरिअर डिझाईन अँण्ड डेकोरेशन/ लिफ्ट अँण्ड एस्कीलेटर मेकॅनिक/ लेदर गुड्स मेकर/ मशिनिस्ट/ मशिनिस्ट (ग्राईंडर)/मेकॅनिक मेंटेनन्स (केमिकल प्लांट) / मरीन इंजिन फिटर/ मरीन फिटर/ मेसन (बिल्डींग कंन्स्ट्रक्टर) / मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँण्ड इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक ऑटो बॉडी पेंटींग/ मेकॅनिक कंन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँप्लायन्स/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स / मेकॅनिक मोटर व्हेईकल / मेकॅनिक मोटर व्हेईकल / मेकॅनिक मायनिंग मशिनरी / मेकॅनिक टू अँण्ड श्री व्हीलर्स / मेकॅनिक टू ट्रॅक्टर / मेकॅनिक इलेक्ट्रीक व्हेईकल / मेटल कटींग अटेंडंट / पेंटर जनरल / प्लंबर/ पंप ऑपरेटर कम मेकॅनिक / रेफ्रिजरेशन अँण्ड एअर कंडीशनर टेक्निशिअन/शिट मेटल वर्कर / सर्व्हेअर/ स्वींग टेक्नॉलॉजी/ टेक्निशिअन मेकॅट्रोनिक्स/ टेक्निशिअन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम / टेक्निशिअन इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन अँण्ड रिपेअर/ टेक्नीशिअन मेडीकल इलेक्ट्रॉनिक्स/ टूल अँण्ड डाय मेकर (डाईज अँण्ड मोड्युल्स) / टूल अँण्ड डाय मेकर (प्रेस टूल, जीग्स अँण्ड फिक्चर्स) / टर्नर/ वेल्डर / वेल्डर (फॅब्रीकेशन अँण्ड फिटींग)/ वेल्डर (GMAW & GTAW)/ वेल्डर (पाईप) / वेल्डर (स्ट्रक्चरल) / वेल्डर (वेल्डींग अँण्ड इन्सपेक्शन ) / वायरमन / वाईड प्लांट टेक्निशिअन )
२) पदाचे नाव – चार्जमन (अँम्युनेशन वर्कशॉप)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार बी.एस्सी (फिजिक्स/केमिस्ट्री/मॅथेमॅटीक्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार इंजि डिप्लोमा (केमिकल इंजि.) उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – चार्जमन (फॅक्टरी)
पदसंख्या – १० (ओपन ५, ओबीसी ४, अज १) पैकी दिव्यांग (अपंग) १ (अस्थिव्यंग १ )
पात्रता – उमेदवार बी.एस्सी (फिजिक्स / केमिस्ट्री/ मॅथेमॅटीक्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजि.) उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – चार्जमन (मेकॅनिक)
पदसंख्या – १८ (ओपन १०, ईडब्ल्यूएस २, ओबीसी २, अजा २, अज २) पैकी दिव्यांग (अपंग) १ (अस्थिव्यंग १)
पात्रता – उमेदवार इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल / प्रोडक्शन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
५) पदाचे नाव – सायंटीफिक असिस्टंट
पदसंख्या – ४ (ओपन २, अजा १, अज १) पैकी दिव्यांग (अपंग) २ (अस्थिव्यंग १, कर्णबधीर १)
पात्रता – उमेदवार बी. एस्सी (फिजिक्स / केमिस्ट्री/ इलेक्ट्रॉनिक्स / ओशोनोग्राफी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
६) पदाचे नाव – ड्राफ्टसमन (कन्स्ट्रक्शन)
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा आणि आयटीआय ड्राफ्टसमनशिप (शिपराईट/वेल्डर/प्लेटर/शिट मेटल/शिप फिटर) उत्तीर्ण असावा तसेच प्रमाणपत्रकोर्स ऑटोकैड प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा.
७) पदाचे नाव – फायरमन
एकूण पदसंख्या – ४४४ (ओपन १९४, ईडब्ल्यूएस ४२, ओबीसी ११२, अजा ६३, अज ३३) पैकी माजीसैनिक ४२, दिव्यांग (अपंग) १५ (अस्थिव्यंग १, कर्णबधीर ८, बहुविध अपंगत्व ६)
विभागानुसार पदसंख्या
• वेस्टर्न नावल कमांड, मुंबई – २३७ (ओपन १०६, ईडब्ल्यूएस २२. ओबीसी ५८, अजा ३२, अज १९ पैकी माजी सैनिक २३, दिव्यांग (अपंग) ७ (कर्णबधीर ४, बहुविध अपंग ३)
• इस्टर्न नावल कमांड, विशाखापट्टणम – ९९ (ओपन ४१, ईडब्ल्यूएस १०, ओबीसी २८, अजा १५, अज ०७) पैकी माजी सैनिक ९, दिव्यांग (अपंग) ४ (कर्णबधीर २, बहुविध अपंग २)
• साऊथर्न नावल कमांड, कोची – ६० (ओपन २५, ईडब्ल्यूएस ०६, ओबीसी १६, अजा ०९, अज ०४) पैकी माजी सैनिक ०६, दिव्यांग (अपंग) २ (कर्णबधीर १, बहुविध अपंग १)
• अंदमान अँण्ड निकोबार कमांड, कोची – ४८ (ओपन २२, ईडब्ल्यूएस ४, ओबीसी १२, अजा ०७ अज ०३) पैकी भाजी सैनिक ०४, दिव्यांग (अपंग) २ (कर्णबधीर १, अस्थिव्यंग १) पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा तसेच फायर फायटींगचा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा.
शारीरिक पात्रता – उंची – (बुटाशिवाय) – १६५ सें.मी (अज उमेदवारांना उंचीमध्ये २.५ सवलत.), छाती – न फुगवता ८१.५ सें.मी, फूगवून ८५ सें.मी वजन – किमान ५० कि.ग्रॅ
शारीरिक क्षमता चाचणी – १) ६३.५ कि. ग्रॅ. वजनाचा माणूस घेऊन १८३ मीटर अंतर ९६ सेकंदामध्ये पार करणे २) लांब उडी – २.७ मीटर रुंद खड्डा दोन्ही पायाच्या सहाय्याने पार करणे ३) ३ मीटर उभा दोर हात व पायाच्या सहाय्याने चढणे.
८) पदाचे नाव – फायर इंजिन ड्रायव्हर
एकूण पदसंख्या – ५८ (ओपन २८, ईडब्ल्यूएस ०५, ओबीसी १४, अजा ७, अज ४) पैकी माजीसैनिक ०५
विभागानुसार पदसंख्या
• वेस्टर्न नावल कमांड, मुंबई – ११ (ओपन ६. ईडब्ल्यूएस ०१, ओबीसी ०२, अजा ०१, अज ०१) पैकी माजी सैनिक ०१
• इस्टर्न नावल कमांड, विशाखापट्टणम – ३१ (ओपन १४, ईडब्ल्यूएस ०३, ओबीसी ०८, अजा ०४, अज ०२) पैकी माजी सैनिक ०३
• अंदमान अँण्ड निकोबार कमांड, कोची – १६ (ओपन ०८, ईडब्ल्यूएस ०१, ओबीसी ०४, अजा ०२, अज ०१) पैकी माजी सैनिक ०१
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा तसेच जड वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक,
शारीरिक पात्रता – उंची (बुटाशिवाय) – १६५ सें.मी (अज उमेदवारांना उंचीमध्ये २.५ सवलत.), छाती न फुगवता ८१.५ सें.मी, फूगवून – ८५ सें.मी, वजन किमान ५० कि.ग्रॅ
शारीरिक क्षमता चाचणी – १) ६३.५ कि.ग्रॅ. वजनाचा माणूस घेऊन १८३ मीटर अंतर ९६ सेकंदामध्ये पार करणे २) लांब उडी-२.७ मीटर रुंद खड्डा दोन्ही पायाच्या सहाय्याने पार करणे ३) ३ मीटर उभा दोर हात व पायाच्या सहाय्याने चढणे
९) पदाचे नाव – पेस्ट कंट्रोल वर्कर
एकूण पदसंख्या – १८ (ओपन १०, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ५, अज २)
विभागानुसार पदसंख्या
• वेस्टर्न नावल कमांड, मुंबई – १७ (ओपन ९, ईडब्ल्यूएस ०१, ओबीसी ५, अज ०२) पैकी माजी सैनिक ०१, अल्पदृष्टी १
• साऊथर्न नावल कमांड, कोची – ओपन १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा हिंदी भाषेचे किंवा स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक.
१०) पदाचे नाव – कुक
साऊथर्न नावल कमांड, कोची – ९ (ओपन ५, ओबीसी १, अजा ३) पैकी अल्पदृष्टी १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
११) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ
साऊथर्न नावल कमांड, कोची – १६ (ओपन ११, ईडब्ल्यूएस २, ओबीसी १, अजा १, अज १) पैकी २ (अल्पदृष्टी १, कर्णबधीर १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०२ ऑगस्ट २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय पद क्रमांक १,२,३,६,९ ते ११ साठी १८ ते २५ वर्षांपर्यंत पद क्रमांक ७ व ८ साठी १८ ते २७ वर्षांपर्यंत तर उर्वरीत सर्वपदांसाठी १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. खेळाडू ५ वर्षे,तर अजा/अज खेळाडू उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत. ओपन विभागीय कर्मचाऱ्यांना ४० वर्षांपर्यंत तर अजा/अज विभागीय कर्मचाऱ्यांना ४५ वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १,९,११ साठी रु.१८०००५६९००/-, पद क्रमांक ७ व १० साठी रु.१९९००-६३२००/ पद क्रमांक ८ साठी रु.२१७००-६९१००/- पद क्रमांक ६ साठी रु.२५५००-८११०००/- तर उर्वरीत सर्व पदांसाठी रु.३५४००-११२४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय नेव्हीच्या इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय इ. ०२ ऑगस्ट २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची १०० गुणांची, ९० मिनिटे कालावधीची, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये बुद्धिमत्ता (२५ प्रश्न, २५ गुण), अंकगणित (२५ प्रश्न, २५ गुण), इंग्रजी (२५ प्रश्न, २५ गुण) आणि सामान्यज्ञान (२५ प्रश्न,२५ गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाब – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेल/एस.एम. एसद्वारे कळविण्यात येइल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.२९५/- अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. महिला/ अजा/अज /अपंग/माजी सैनिक उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.joinindinanavy.gov.in या वेबसाईटवरून दि. ०२ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. त्यानंतर अलीकडील काळातील फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईरिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) वयाचा दाखला ४) जातीचा दाखला ५) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी उत्पन्न व मालमत्ता याचा दाखला ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ८) आधारकार्ड उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.joinindinanavy.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याचा व परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक – ०२ ऑगस्ट २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *