टाटा मेमोरिअल सेंटर, मुंबई : लोअर डिव्हीजन क्लार्क, सायंटीफिक ऑफीसर्स इ. पदांसाठी पदवी/ उच्चपदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १८ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – सायंटीफिक ऑफीसर (डाटा अँनालिस्ट)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार एम.एस्सी (आयटी/कॉम्प्युटर सायन्स/ स्टॅटेस्टीक्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार बी.टेक (कॉम्प्युटर सायन्स) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३५ वर्षे
२) पदाचे नाव – सायंटीफिक ऑफीसर सी
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार एम.एस्सी (बायोलॉजीकल सायन्स/ मायक्रोबायोलॉजी/ लाईफ सायन्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार उच्चपदवी (सोशल सायन्स/सोशल वर्क) उत्तीर्ण असावा. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वय – ३५ वर्षे
३) पदाचे नाव – सायंटीफिक असिस्टंट बी (बायोमेडीकल)
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार इंजि डिप्लोमा (बायोमेडीकल/मेडीकल इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३० वर्षे
४) पदाचे नाव – सायंटीफिक असिस्टंट बी (रेडीएशन ऑनकोलॉजी)
पदसंख्या – अज १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बी.एस्सी (फिजिक्स) उत्तीर्ण असावा आणि पदव्युत्तर डिप्लोमा (रेडीओथेरपी टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३० वर्षे
५) पदाचे नाव – सायंटीफिक असिस्टंट बी (अँनिमल सायन्स)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बी.एस्सी (न्युक्लीअर मेडीसीन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – ३० वर्षे
६) पदाचे नाव – लोअर डिव्हीजन क्लार्क
पदसंख्या – अजा १
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वय – २७ वर्षे
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दि. १८ जुलै २०२४ रोजीचे धरले जाईल. ओबीसी ३ वर्षे तर अजा उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग व माजी सैनिक उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ व २ साठी रु.१५६००-३९१००/- + ग्रेड पे ५४००/- पद क्रमांक ३ ते ५ साठी रु.९३००-३४८००/- + ग्रेड पे ४२००/- तर पद क्रमांक ६ साठी रु.५२००-२०२००/- + ग्रेड पे १९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांचे वय, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव इ. दि. १८ जुलै रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा /स्कील टेस्ट/ मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची आवश्यकतेनुसार स्कील टेस्ट/ मुलाखत घेण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन, वैद्यकीय चाचणी घेऊन आणि चारित्र्य पडताळणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/पासपोर्ट/मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांना रु.३००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पध्दतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग/महिला/माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.actrec.gov.in वेबसाईटवरून दि. १८ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. उमेदवारांनी अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायीक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ५) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळेस ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत परीक्षा फी ई-रिसीट, प्रवेशपत्र, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात. शासकिय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच अर्जासोबत ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ जोडावे. उमेदवारांनी निवडीच्यावेळी वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी www.actrec.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – १८ जुलै २०२४ सायंकाळी ०५.३० वाजेपर्यंत
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *