ऑर्डीनंन्स फॅक्टरी : ९० अप्रांटिस ट्रेनीज् पदांकरीता १० वी/आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून दिनांक ०४ जुलै २०२४ पूर्वी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – अप्रांटिस ट्रेनी
पदसंख्या – ९०
पात्रतेनुसार पदविभागणी –
१) नॉन-आयटीआय – ४७
शाखेनुसार पदविभागणी –
• फिटर – १० (ओपन ५, ओबीसी ३, अजा १, अज १) पैकी अस्थिव्यंग १
• टर्नर – १५ (ओपन ८, ओबीसी ४, अजा १, अज २) पैकी कर्णबधीर १
• मशिनिस्ट – १६ (ओपन ८, ओबीसी ४, अजा २, अज २)
• मेकॅनिक मशिन टूल मेंटेनन्स – ६ (ओपन ३, ओबीसी १, अजा १, अज १) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी १० वी उत्तीर्ण असावा. मात्र गणित आणि विज्ञान विषयास किमान ४० % गुण मिळालेले असणे आवश्यक.
२) आयटीआय – ४३
• फिटर – ९ (ओपन ५, ओबीसी २, अजा १, अज १) पैकी कर्णबधीर १
• टर्नर – १४ (ओपन ८, ओबीसी ४, अजा १, अज १)
• मशिनिस्ट – १५ (ओपन ८, ओबीसी ४, अजा १, अज २) पैकी कर्णबधीर १
• इलेक्ट्रीशिअन – ३ (ओपन २, ओबीसी १)
• वेल्डर – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी १० वी उत्तीर्ण असावा आणि संबंधित विषयामधुन आयटीआय उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०४ जुलै २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १४ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत.
विद्यावेतन – उमेदवारांना नॉन आयटीआय साठी पहिल्या वर्षी ६०००/- तर दुसऱ्यावर्षी ६,६००/- द.म. तर आयटीआय साठी ८०५०/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जाईल.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्येत बदल गृहित धरावा. २) यापूर्वी अप्रांटीस पुर्ण केलेले उमेदवार अर्ज करण्यास अपात्रनिवड पध्दत उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार केली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकीय चाचणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि अर्जासोबत जोडलेल्या सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती आणि फोटो असलेले ओळखपत्र (पॅनकार्ड/ आधारकार्ड/पासपोर्ट/ड्रायव्हींग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in या वेबसाईट वरुन नोंदणी करावी. ऑर्डनन्स क्लोथिंग फॅक्टरी, आवडीसाठी अर्ज करावा. त्यानंतर विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे २) आय.टी.आय. गुणपत्र व प्रमाणपत्र ३) वयाचा दाखला ४) जातीचे प्रमाणपत्र ५) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ६) आधारकार्ड ७) परीक्षा फी. डी.डी. ७) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा. उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती अर्जासोबत जोडाव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “Application for the post of __________” असे लिहिणे आवश्यक. तसेच उमेदवारांनी वरील प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षांकीत प्रती व पोलीस व्हेरीफिकेशन प्रमाणपत्र आणि चारित्र्याचा दाखला निवडीच्या वेळी सादर करावा.
अर्ज करण्याचा पत्ता – The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of india Enterprise Ambarnath Dist – Thane, Maharashtra, Pin : 421502
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – ०४ जुलै २०२४