स्टाफ सिलेक्शन कमिशन : कम्बाईन्ड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षेद्वारे १७७२७ इन्कमटॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट, सब इन्स्पेक्टर इ. पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २४ जुलै २०२४ पूर्वी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नव – अस्टिंट सेक्शन ऑफीसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – केंद्र सरकारचे मंत्रालय व इतर विभाग (CSS) केंडर
२) पदाचे नाव – असिस्टंट सेक्शन ऑफिसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – इंटलिजन्स ब्युरो (IB),
३) पदाचे नाव – असिस्टंट सेक्शन ऑफिसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – रेल्वे मंत्रालय (Ministry of Railway)
४) पदाचे नाव – असिस्टंट सेक्शन ऑफिसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – मंत्रालयातील इतर विभाग (Ministry of External Affiars)
५) पदाचे नाव – असिस्टंट सेक्शन ऑफिसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – संरक्षण मंत्रालय (AFHQ)
६) पदाचे नाव – असिस्टंट सेक्शन ऑफिसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – इलेक्ट्रॉनिक अँण्ड इन्फर्मेशन टेकनॉलॉजि मंत्रालय (Ministry of Electronics and Information Technology)
७) पदाचे नाव – असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ग्रुप बी),
भरती ठिकाण – इतर मंत्रालय/संगठना/विभाग (Other Ministries/Department/Organisations)
८) पदाचे नाव – इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, (ग्रुप सी),
भरती ठिकाण – CBDT
०९) पदाचे नाव – इन्स्पेक्टर (सेंट्रल एक्साईज), (ग्रुप बी),
भरती ठिकाण – CBIC
१०) पदाचे नाव – इन्स्पेक्टर (प्रिव्हेंटीव्ह ऑफिसर), (ग्रुप बी),
भरती ठिकाण – CBIC
११) पदाचे नाव – इन्स्पेक्टर (एक्झामिनर), (ग्रुप बी),
भरती ठिकाण – CBIC
१२) पदाचे नाव – असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – डायरेकटोरेट ऑफ एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू
१३) पदाचे नाव – सब इन्स्पेक्टर्स, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – CBI
१४) पदाचे नाव – इन्स्पेक्टर पोस्टस, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – पोस्ट खात्याच्या कार्यालयात
१५) पदाचे नाव – इन्स्पेक्टर (ग्रुप बी),
भरती ठिकाण – Central Bureau of Narcotics
१६) पदाचे नाव – असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफीसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – इतर मंत्रालय/संगठना/विभाग (Other Ministries/Department/Organisations)
१७) पदाचे नाव – एक्झीक्युटीव्ह असिस्टंट, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – CBIC
१८) पदाचे नाव – रिसर्च असिस्टंट, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – NHRC नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन
१९) पदाचे नाव – डिव्हीजनल अकौंटंट, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – C&AG ऑफिसेस
२०) पदाचे नाव – सब इन्स्पेक्टर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – National Investigation Agency (NIA)
२१) पदाचे नाव – सब इन्स्पेक्टर / ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफीसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – Narcotics Control Bureau (MHA)
२२) पदाचे नाव – ज्युनिअर स्टॅटॅस्टीकल ऑफिसर, (ग्रुप बी),
भरती ठिकाण – M/o Statistics & Prog. Implementation.
२३) पदाचे नाव – ऑडीटर, (ग्रुप सी),
भरती ठिकाण – Offices under C&AG
२४) पदाचे नाव – ऑडीटर, (ग्रुप सी),
भरती ठिकाण – CGDA
२५) पदाचे नाव – ऑडीटर, (ग्रुप सी),
भरती ठिकाण – Other Ministries/Departments)
२६) पदाचे नाव – अकौंटंट (ग्रुप सी),
भरती ठिकाण – C & AG
२७) पदाचे नाव – अकौंटंट (ग्रुप सी),
भरती ठिकाण – Controller General of Accounts
२८) पदाचे नाव – अकौंटंट / ज्युनियर अर्कोटंट, (ग्रुप सी),
भरती ठिकाण – Other Ministries / Departments
२९) पदाचे नाव – पोस्टल असिस्टंट/सॉटींग असिस्टंट (ग्रुप सी),
भरती ठिकाण – पोस्ट ऑफीस (Depaertment of Post, Ministry of Communication)
३०) पदाचे नाव – सिनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट / अप्पर डिव्हीजन क्लार्क (ग्रुप सी),
भरती ठिकाण – सेंट्रल गर्व्हमेंट ऑफिसेस / Ministry other than CSCS Cadres
३१) पदाचे नाव – सिनिअर अँडमिनिस्ट्रेटीव्ह असिस्टंट (ग्रुप सी),
भरती ठिकाण – संरक्षण मंत्रालय (Military Engineering Services, Ministry of Defence)
३२) पदाचे नाव – टॅक्स असिस्टंट (ग्रुप सी),
भरती ठिकाण – CBDT
३३) पदाचे नाव – टॅक्स असिस्टंट (ग्रुप सी),
भरती ठिकाण – CBIC
३४) पदाचे नाव – सब इन्स्पेक्टर, (ग्रुप सी),
भरती ठिकाण – Central Bureau of Narcotics,
पदानुसार पात्रता – पात्रता दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजीची धरली जाईल. सर्व पदांसाठी पदवीस टक्केवारीची कोणतीही अट नाही. सर्व पदांसाठी उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. मात्र ज्युनिअर स्टॅटेस्टीकल ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १२ वीस गणित विषयास ६०% गुण असणे आवश्यक. किंवा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा मात्र पदवीस स्टॅटीस्टीक्स विषय अभ्यासलेला असावा. असिस्टंट सेक्शन ऑफिसर (CSS), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (MEA), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (AFHQ), असिस्टंट (SFIO), असिस्टंट (GSI) इन्स्पेक्टर (जनरल एक्साईज), इन्स्पेक्टर (प्रिवेंटीव्ह ऑफीसर) आणि इन्स्पेक्टर (एक्झामिनर) पोस्टल असिस्टंट / सॉटींग असिस्टंट पदांसाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक.
• शारिरीक पात्रता – १) इन्स्पेक्टर्स (सेंट्रल एक्साईज / एक्झामिनर / प्रिव्हेंटीव्ह ऑफिसर) / इन्स्पेक्टर अँण्ड सब इन्स्पेक्टर (सीबीएन) साठी – पुरुष – उंची कमीत कमी १५७.५ सें.मी. छाती – ८१ सें.मी., छाती ५ सेमी फुगणे आवश्यक अज उमेदवारांना उंचीमध्ये ५ से.मी. सवलत. महिला –उंची कमीत कमी १५२ सें.मी., वजन कमीत कमी ४८ किलो अज उमेदवारांना उंचीमध्ये २.५ सें.मी. सवलत. तसेच वजनात २ किलो सवलत दिली जाईल.
• शारीरिक क्षमता चाचणी – पुरुष – १५ मिनिटात १६०० मिटर अंतर चालणे आणि ३० मिनीटात ८ कि.मी. सायकलींग करणे. महिला – २० मिनिटात १ कि.मी. चालणे, २५ मिनीटात ३ कि.मी. सायकलींग करणे.
२) सी.बी.आय. सब इन्स्पेक्टर्स – उंची (पुरुष) १६५ सें.मी., (महिला) १५० सें.मी., अज उमेदारांसाठी उंचीत ५ सें.मी. सवलत. पुरूष उमेदवारांची छाती ७१-७६ सें.मी. दृष्टी (चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय) दूरदृष्टी एक डोळा ६/६ डोळा ६/९, जवळची दृष्टी एक डोळा ०.६ व आणि दुसरा डोळा ०.८
३) सब इन्स्पेक्टर्स (NIA) पदासाठी – उंची (पुरुष) १७० सें.मी., (महिला) १५० सें.मी., अज उमेदारांसाठी उंचीत ५ सें.मी. सवलत. पुरूष उमेदवारांची छाती ७१-७६ सें.मी. दृष्टी (चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय) दूरदृष्टी एक डोळा ६/६ आणि दुसरा डोळा ६/९, जवळची दृष्टी एक डोळा ०.६ व दुसरा डोळा ०.८ पायाचे तळवे सपाट, तिरळे डोळे, गुडघे गुडघ्याला टेकलेले अशा उमेदवारांनी अर्ज करु नयेत. उमेदवार मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि. १ ऑगस्ट २०२४ रोजीचे धरले जाईल.
१) पद क्रमांक २३ ते पद क्रमांक ३४ साठी – उमेदवाराचे वय १८ ते २७ पर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०२/०८/ १९९७ ते ०१/०८/२००६ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
२) पद क्रमांक २,६,७,८,९,१२,१४, १५, १६, १७,१९,२०,२१ साठी – उमेदवाराचे वय ३० पर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २/०८/१९९४ ते ०१/०८/२००४ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
३) पद क्रमांक २२ पदासाठी – उमेदवाराचे वय ३२ पर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २/०८/१९९४ ते ०१/ ०८/२००६ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
४) उर्वरीत सर्वपदांसाठी – उमेदवाराचे वय २० ते ३० पर्यंत म्हणजेच उमेदवाराचा जन्म ०२/०८/१९९४ ते ०१/०८/२००४ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.
वयात सवलत – ओबीसींना ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे, अपंगांसाठी – ओपन १० वर्षे, ओबीसी १३ वर्षे, अजा/अज १५ वर्षे, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (ग्रुप सी) – ओपन ४० पर्यंत,अजा/अज ४५ पर्यंत वयोमर्यादा शिथिल केली जाईल. विधवा, घटस्फोटीत महिला किंवा कायदेशीररीत्या विभक्त झालेल्या परंतु पुनर्विवाह न केलेल्या महिलांना (ग्रुप सी ) – ओपन ३५ वर्षे, अजा/अज ४० वर्षे पर्यंत सवलत. युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी – ३ वर्षे, अनु. जाती/ जमाती ८ वर्षे. तर माजी सैनिकांना वयामध्ये नियमाप्रमाणे सवलत.
सर्वपदांसाठी समान अटी – १) उमेदवारांची पात्रता, अनुभव इ. दिनांक ०१ ऑगस्ट २०२४ रोजीचे धरले जाईल. २) वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना स्टाफ सिलेक्शनच्या सर्व सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि स्कील टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षा दोन विभागामध्ये म्हणजेच Tier-। (पूर्व परीक्षा), Tier-II (मूख्य परीक्षा) मध्ये विभागली जाईल. प्रथम उमेदवारांची २०० गुणांची १ तास कालावधीची Tier-I (पूर्व परीक्षा) ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. यामध्ये बुद्धीमत्ता (२५ प्रश्न, ५० गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न, ५० गुण), अंकगणित (२५ प्रश्न, ५० गुण) आणि इंग्रजी कॉम्प्रेहेंशन (२५ प्रश्न, ५० गुण) यावर आधारित प्रश्न विचारले जाते. परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असुन परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.५० गुण वजा केले जातील. Tier (पूर्व परीक्षा) मधील पात्र उमेदवारांची Tier-II (मूख्य परीक्षा) ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ३ पेपरमध्ये विभागलेली असून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. पेपर-१ ४५० गुणांचा २ तास ३० मिनिटे कालावधीचा असून ३ विभांचा असेल यामध्ये विभाग १- मॅथेमिटीकल अँबीलीटीज (३० प्रश्न, ९० गुण), बुद्धीमत्ता (३० प्रश्न, ९० गुण) कालावधी १ तास, विभाग २ इंग्रजी भाषा आणि कॉम्प्रेहेंशन (४५ प्रश्न, १३५ गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न, ७५ गुण) कालावधी १ तास विभाग ¬। परीक्षा ३ फक्त असिस्टंट सेक्शन ऑफिसर (CSS), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (MEA), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (AFHQ), असिस्टंट (SFIO), असिस्टंट (GSI) इन्स्पेक्टर (जनरल एक्साईज), इन्स्पेक्टर (प्रिवेंटीव्ह ऑफीसर) आणि इन्स्पेक्टर (एक्झामिनर), पोस्टल असिस्टंट/ सॉटींग असिस्टंट या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवरांसाठी हा विभाग असून यामध्ये संगणकाच्या ज्ञानावर आधारीत (२० प्रश्न, ६० गुण कालावधी १५ मिनिटे) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. तर सर्व पदांसाठी १५ मिनिटे कालावधीची डाटा एन्ट्री टेस्ट घेतली जाईल. पेपर १ मध्ये प्रत्येक बरोबर उत्तरांसाठी ३ गुण दिले जातील तर चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण वजा केला जाईल. पेपर १ हा सर्व पदांसाठी आवश्यक असेल. ज्युनिअर करणाऱ्या स्टॅस्टेस्टीकल ऑफीसर पदांसाठी अर्ज उमेदवारांसाठी पेपर २ असेल. यामध्ये स्टेंटॅस्टीक्स (१०० – प्रश्न २०० गुण कालावधी २ तास) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. तर असिस्टंट ऑडीट ऑफीसर/ असिस्टंट अकौंट्स ऑफीसर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी पेपर ३ असेल यामध्ये जनरल स्टडीज (फायनान्स अँण्ड इकॉनॉमिक्स) (१०० प्रश्न २०० गुण – कालावधी २ तास) यावर अधारीत असतील. पेपर २ व ३ साठी प्रत्येक बरोबर उत्तरांसाठी २ गुण दिले जातील तर चुकीच्या उत्तरांसाठी ०.५० गुण वजा केले जातील. Tier-।, Tier-II मधील प्रत्येक पेपर मध्ये ओपन उमेदवारांनी ३३ % ओबीसी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी २५ %, तर इतर उमेदवारांनी २० % गुण मिळविणे आवश्यक. यानुसार पात्र उमेवारांची गुणवत्ता यादी तयार करुन पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
• ऑनलाईन परीक्षा दिनांक व वेळ -Tier-। सप्टेंबर ऑक्टोबर २०२४
• परीक्षा केंद्रे व कोड क्रमांक – महाराष्ट्रात कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, अमरावती, नांदेड, जळगाव, ही परीक्षा केंद्रे असून जवळचे परीक्षा केंद्र पणजी हे आहे. याशिवाय भारतभर इतरही परीक्षा केंद्रे आहेत. त्यासाठी वेबसाईट पहावी.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.१००/- असून ती नेटबँकींग/क्रेडीटकार्ड/डेबीट कार्ड द्वारे भरणे आवश्यक, याशिवाय उमेदवार स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने फी भरु शकतात. अर्जाचा पहिला भाग भरल्यानंतर परीक्षा फी चलन उपलब्ध होईल. महिला / अजा/ अज / मा. सैनिक उमेदवारांना परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी ssc.gov.in या वेबसाईटवरून दि. २४ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वतःजवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करून अपलोड करावी. व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी किंवा चलनाची प्रिंट काढून स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत रोखीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व सही २) दहावीचे गुणपत्र/प्रमाणपत्र (१० वी रोल नं.) ३) आधारकार्ड ४) शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ५) जात प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंढाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, नावात बदल असण्यास गॅझेट/ विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विधवा/घटस्फोटीत महिला उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती तसेच रंगीत फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत. तसेच निवडीच्यावेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी ssc.gov.in ही वेबसाईट पहावी.
१) ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – २४ जुलै २०२४
२) ऑनलाईन परीक्षा फी भरण्याचा अंतिम दिनांक – २५ जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
इतर सूचना – अंपग उमेदवारांनी असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर / इन्स्पेक्टर (Central Bureau of Narcotics)/ सब इन्स्पेक्टर (NIA)/ सब इन्स्पेक्टर (CBI) / इनस्पेक्टर पोस्ट पदांसाठी अर्ज करु नयेत.