सिक्युरीटी अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया : ९७ असिस्टंट मॅनेजर्स पदांसाठी पदवी/उच्चपदवी/सीए इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ३० जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर (जनरल)
पदसंख्या – ६२ (ओपन ३४, ईडब्ल्यूएस ६, ओबीसी १४, अजा ७, अज १) पैकी चलनवलन विषयक विकलांगता किंवा मेंदूचा अर्धांग वायू २
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची उच्च पदवी उत्तीर्ण असावा. किंवा कायदा पदवी उत्तीर्ण असावा किंवा इंजि पदवी उत्तीर्ण असावा किंवा सीए/सीएस/सीएफए / सीडब्ल्यूए परीक्षा उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर (लिगल)
पदसंख्या – ५ (ओपन २. ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अजा १) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार कायदा पदवी उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी)
पदसंख्या – २४ (ओपन १०, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ८, अजा २. अज २) पैकी कर्णबधीर १, अल्पदृष्टी २
पात्रता – उमेदवार इंजि पदवी (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड कम्युनिकेशन / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ कंम्प्युटर सायन्स) उत्तीर्ण असावा. किंवा एमसीए उत्तीर्ण असावा. किंवा कोणत्याही शाखेची पदवी आणि उच्च पदवी (कंम्प्युटर/ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग)
पदसंख्या – २ (ओपन १, अज १) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार इंजि पदवी (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा.
५) पदाचे नाव – रिसर्च
पदसंख्या – २ (ओपन १. अजा १) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार उच्च पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा (इकॉनॉमिक्स / कॉमर्स/बीझनेस अँडमिनिस्ट्रेशन/इकॉनॉमेट्रीक्स/क्वाटीटेटीव्ह इकॉनॉमिक्स/फायनांन्शीअल इकॉनॉमिक्स / मॅथेमॅटीकल इकॉनॉमिक्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार उच्च पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा (फायनांन्स / कांटेटीव्ह फायनान्स / मॅथेमॅटीकल फायनांन्स/क्वांटेटीव्ह टेकनीक्स/इंटरनॅशनल फायनान्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार उच्च पदवी/पदव्युत्तर डिप्लोमा (स्टॅटेस्टीक्स / मॅथेमॅटीकल स्टेंटेस्टीक्स / इन्फॉरमेटीक्स / अँप्लाईड स्टॅटेस्टीक्स / स्टेंटेस्टीक्स अँण्ड इन्फॉरमेटीक्स) उत्तीर्ण असावा.
६) पदाचे नाव – ऑफीशिअल लँग्वेज
पदसंख्या – २ (ओपन १, अज १)
पात्रता – उमेदवार उच्च पदवी (हिंदी) उत्तीर्ण असावा मात्र पदवीस इंग्रजी विषय अभ्यासलेला असणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ३१ मार्च २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म दि. ०१ एप्रिल १९९४ नंतर झालेला असावा. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अज / अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात ५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु. ४४५००-८९१५०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दि. ३१ मार्च २०२४ रोजीची धरली जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन पूर्व परीक्षा (फेज१), मुख्य परीक्षा (फेज-२) आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची २०० गुणांची व १ तास ४० मिनिटे कालावधीची ऑनलाईन पूर्व परीक्षा घेण्यात येईल. यामध्ये २ पेपर असतील पेपर १-१०० गुणांचा आणि ६० मिनिटे कालावधीचा असेल. यामध्ये इंग्रजी भाषा, – अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, सिक्युरीटी मार्केट विषयक ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. तर पेपर २-१०० गुणांचा आणि ४० मिनिटे कालावधीचा असेल. यामध्ये असिस्टंट मॅनेजर (जनरल) पदांसाठी कॉमर्स, अकौंटन्सी, फायनान्स, मॅनेजमेंट, कॉस्टींग, कंपनी अँक्ट, इकॉनॉमिक्स या विषयांवर आधारीत, असिस्टंट मॅनेजर (रिसर्च) पदांसाठी इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रीक्स, स्टॅटेस्टीक्स, फायनान्स आणि कॉमर्स या विषयांवर आधारीत तर उर्वरीत सर्व पदांसाठी संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पेपर १ मिळविणे आवश्यक. मध्ये ३० % तर पेपर २ मध्ये ४० % गुण ऑनलाईन पूर्व परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुख्य लेखी परीक्षा घेतली जाईल. मुख्य लेखी परीक्षेमध्ये २ पेपर असतील पेपर १ मध्ये इंग्रजी भाषेवर आधारीत १०० गुणांचे वर्णनात्मक स्वरुपाचे प्रश्न विचारले जातील. तर तर पेपर २ वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचा १०० गुणांचा आणि ४० मिनिटे कालावधीचा असेल. मध्ये असिस्टंट मॅनेजर (जनरल) पदांसाठी कॉमर्स, अकौंटन्सी, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉस्टींग, कंपनी अँक्ट, इकॉनॉमिक्स या विषयांवर आधारीत, असिस्टंट मॅनेजर (रिसर्च) पदांसाठी इकॉनॉमिक्स, इकॉनॉमेट्रीक्स, स्टॅटेस्टीक्स, फायनान्स आणि कॉमर्स या विषयांवर आधारीत तर उर्वरीत सर्व पदांसाठी संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पेपर १ मध्ये ३० % तर पेपर २ मध्ये ४० % गुण मिळविणे आवश्यक मुख्य परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची मुख्य लेखी परीक्षेमध्ये मिळालेले गुण आणि मुलाखतीमध्ये मिळालेले गुण यांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे. मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
पूर्व परीक्षा केंद्रे – महाराष्ट्रासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई / ठाणे/ मुंबई/ठाणे/ नवी मुंबई, अमरावती, औरंगाबाद, जळगांव, नागपूर, नाशिक, इ. परीक्षा केंद्रे आहेत. गोवासाठी पणजी परीक्षा केंद्र आहे इतर राज्यातील परीक्षा केंद्रांसाठी वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन पूर्व परीक्षा दिनांक – २७ जुलै २०२४ ऑनलाईन मुख्य परीक्षा दिनांक – ३१ ऑगस्ट २०२४,
प्रोबेशन कालावधी – २ वर्षे
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी रु. १०००/- + १८ % GST तर अजा/अज/अपंग उमेदवारांसाठी रु. १००/- + १८ % GST अशी परीक्षा फी असून ती नेट बँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.sebi.gov.in या वेबसाईटवरून दि. ३० जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व विहित नमुन्यातील स्वहस्ताक्षरामध्ये लिहिलेले डिक्लरेशन स्कॅन करुन अपलोड करावे व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १ ) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला) फोटो, सही व डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा २) विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरामध्ये लिहिले डिक्लरेशन ३) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र ४) आधार क्रमांक उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत प्रवेशपत्र, परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, मार्जी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.sebi.gov.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ३० जून २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *