रिट्स इंडिया लिमिटेड : असिस्टंट मॅनेजर्स २०२४ - govtjobsu.com

रिट्स इंडिया लिमिटेड : असिस्टंट मॅनेजर्स २०२४

omkar
5 Min Read

रिटस् इंडिया लिमिटेड : असिस्टंट मॅनेजर्स पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २८ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर, VC No. – १६३/२४,

पदसंख्या – १० (ओपन ५, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा १, अज १)

पात्रता – उमेदवार किमान ६०% गुणांनी (ओबीसी/अजा/ अज/दिव्यांग (अपंग) ५०% गुणांनी) इंजि पदवी (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/आयटी/कॉम्प्युटर इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर, VC No. – १६४/२४,

पदसंख्या – ५ (ओपन ३, ओबीसी १, अजा १)

पात्रता – उमेदवार किमान ६०% गुणांनी (ओबीसी/अजा/ अज/दिव्यांग (अपंग) ५०% गुणांनी) इंजि पदवी (इलेक्ट्रीकल/ इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर सप्लाय/इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल/ इंडस्ट्रीअल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन / ॲप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स/डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

वयोमर्यादा – दि. ०१ मार्च २०२४ रोजी उमेदवाराचे वय ३२ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/ अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. दिव्यांग (अपंग) उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ५ वर्षे सवलत. माजी सैनिक उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.

वेतनश्रेणी – उमेदवारांना दोन्ही पदांसाठी ₹४०,००० – १,४०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय. उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ०१ मार्च २०२१ रोजीचे धरले जाईल.

निवड पध्दत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी किमान ५०% गुण, तर ओबीसी/ अजा/अज/दिव्यांग(अपंग) उमेदवारांनी किमान ४५% गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी आणि वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.

प्रोबेशन कालावधी – २ वर्षे

प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश ई-मेल/एस.एम.एस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन/ओबीसी उमेदवारांना ₹६००/-, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अजा/अज/दिव्यांग(अपंग) उमेदवारांना ₹ ३००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/ डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अर्ज कसा करावा उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.rites.com या वेबसाईटवरून दि. २८ जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर परीक्षा फी ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे कोणत्याही पत्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे  – १) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे ३) जातीचा दाखला ४) वयाचा दाखला ५) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ६) दिव्यांग (अपंग) असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत २ पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो, वयाच्या पुराव्यासाठी १० वी चे प्रमाणपत्र, सर्व शैक्षणिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे, जातीचा दाखला व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, फोटो व पत्ता असलेले ओळखपत्र (पासपोर्ट/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स/आधारकार्ड इ.), पॅन कार्ड, अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र, दिव्यांग (अपंग) असल्यास तसे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती दिलेल्या क्रमानुसार जोडून सादर करणे आवश्यक. शासकिय/निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.rites.com ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – २८ जून २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *