राष्ट्रीय केमिकल्स, मुंबई : १५८ मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी इंजि पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०१ जुलै २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (केमिकल), पोस्ट कोड – MTCHEM / 062024
पदसंख्या – ५१ (ओपन २१, ईडब्ल्यूएस ५, ओबीसी १४, अजा ७, अज ४) पैकी अपंग ६
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज ५५ % गुणांनी) इंजि पदवी (केमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (मेकॅनिकल), पोस्ट कोड – MTMECH/062024
पदसंख्या – ३० (ओपन १३, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ८, अजा ४, अज २) पैकी अपंग १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज ५५% गुणांनी) इंजि पदवी (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रीकल), पोस्ट कोड – MTELE/062024
पदसंख्या – २७ (ओपन ११, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ७, अजा ४, अज ३)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा ५५ % गुणांनी) इंजि पदवी (इलेक्ट्रीकल) उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन), पोस्ट कोड – MTINST/062024
पदसंख्या – १८ (ओपन ७, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ५, अजा ३, अज १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा/अज ५५ % गुणांनी) इंजि पदवी (इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण असावा.
५) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हील), पोस्ट कोड – MTCIV/062024
पदसंख्या – ४ (ओपन १, ओबीसी १, अजा १, अज १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि पदवी (सिव्हील) उत्तीर्ण असावा.
६) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (सीसी लॅब), पोस्ट कोड – MTCCLAB/062024
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी (अजा ५० % गुणांनी) इंजि पदवी (केमिकल / पेट्रोकेमिकल / केमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा.
७) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (इंडस्ट्रीअल इंजि.) पोस्ट कोड – MTIE/062024
पदसंख्या – ३ ( ओपन १, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी इंजि पदवी (इंडस्ट्रीअल इंजि.) उत्तीर्ण असावा.
८) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटींग), पोस्ट कोड – MTMKTG/062024
पदसंख्या – १० (ओपन ४ ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा १, अज १) पैकी अपंग २
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज ५५ % गुणांसह) पदवी (ॲग्रीकल्चर / ॲग्रीकल्चर इंजि.) उत्तीर्ण असावा तसेच एमबीए / एमएमएस (मार्केटींग / ॲग्री बीझनेस मॅनेजमेंट/ ॲग्री बीझनेस ॲण्ड मॅनेजमेंट/ॲग्रीकल्चर) उत्तीर्ण असावा.
९) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (ह्युमन रिसोर्स), पोस्ट कोड – MTHR/062024
पदसंख्या – ५ (ओपन १, ओबीसी २, अजा १, अज १) पात्रता उमेदवार ६० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी आणि उच्च पदवी (ह्युमन रिसोर्स/पर्सोनेल /सोशल वर्क/ वेलफेअर/इंडस्ट्रीअल रिलेशन्स/ लॅबर स्टडीज) उत्तीर्ण असावा
१०) पदाचे नांव – मॅनेजमेंट ट्रेनी (ॲडमिनिस्ट्रेशन), पोस्ट कोड – MTADMN/06/2024
पदसंख्या – ४ (ओपन २, ओबीसी १. अजा १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी आणि एमबीए (ह्युमन रिसोर्स)/ एमएमएस/ उच्च पदवी (ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ॲण्ड मॅनेजमेंट) / उच्च पदवी (ह्युमन रिसोर्स) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०१ जून २०२४ उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असावे, ओबीसी ३ तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अज अपंग १५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹४०००० – १४००००/- अशी नियमीत वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय सर्व सोयी, सवलती, भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ०१ जून २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करून त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल, ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० प्रश्न २०० गुणांची आणि ९० मिनिटे कालावधीची असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये संबंधित विषयाचे ज्ञान (५० प्रश्न- १०० गुण), सामान्य इंग्रजी, अंकगणित, बुद्धीमत्ता, सामान्य ज्ञान (५० प्रश्न- १०० गुण) इ. वर आधारीत प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड केली जाईल.
परीक्षा केंद्रे – मुंबई, नागपूर, हैद्राबाद, बेंगलोर, भोपाळ, दिल्ली, लखनऊ, चेन्नई, गुवाहाटी, कोलकता.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र संबंधित वेबसाईटवरुन डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) इ. सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – ओपन/ओबीसी/आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांना ₹ १०००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकींग / क्रेडीट कार्ड/डेबीट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज / अपंग / माजी सैनिक / महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक उमेदवारांनी www.refind.com या वेबसाईटवरून दि. ०१ जुलै २०२४ पर्यंत अर्ज भरावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि विहित नमुन्यातील डिक्लरेशन स्कॅन करून अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणार रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करून ठेवावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि विहित नमुन्यातील डिक्लरेशन २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव प्रमाणपत्र ४) पॅनकार्ड ५) बँक पासबूक उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत परीक्षा फी ई-रिसीट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला, असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास तसे प्रमाणपत्र, माजीसैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/ विभागीय कर्मचाऱ्यांनी निवडीच्यावेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी तसेच निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी उमेदवारांनी www.rcfltd.com ही वेबसाईट पहावी.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – ०१ जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *