क्वॉलीटी ॲश्युरन्स, मुंबई : मल्टी टास्कींग स्टाफ इ पदांसाठी १० वी / १२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०६ जुलै २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – सिनिअर स्टोअर किपर
पदसंख्या – ओपन २
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. मटेरीअल मॅनेजमेंटचा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड ।।
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. डिक्टेशन गती १० मिनिटामध्ये ८० शप्रमी आणि ट्रान्सक्रीपशन गती इंग्रजी ५० एमटीएस / हिंदी ६५ एमटीएस आवश्यक.
३) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ (ऑफीस)
पदसंख्या – ३ (ओपन २, ईडब्ल्यूएस १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – मल्टी टास्कींग स्टाफ (सॅनिटरी)
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०६ जुलै २०२४ रोजी पद क्रमांक १ व २ साठी ओपन उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षापर्यंत तर पद क्रमांक ३ व ४ साठी १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे तर अजा उमेदवारांना ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/अज अपंग १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयामध्ये नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना पद क्रमांक १ व २ साठी रु.२५५००-८११००/- तर पद क्रमांक ३ व ४ साठी रु.१८०००-५६९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० गुणांची आणि २ तास कालावधीची असेल. लेखी परीक्षेमध्ये बुद्धीमत्ता (२५ प्रश्न, २५ गुण), अंकगणित (२५ प्रश्न, २५ गुण), इंग्रजी भाषा (२५ प्रश्न,२५ गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न, २५ गुण) यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल. चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. प्रवेशपत्रा सोबत मूळ प्रमाणपत्रे व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र/ ड्रायव्हिंग लायसन्स) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यात टंकलिखीत स्वरुपात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपले अर्ज फक्त रजिस्टर/स्पिड पोस्टाने पाठवावेत.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) अनुभव असल्यास तसा दाखला ४) जातीचे प्रमाणपत्र ५) ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) रहिवासी दाखला ७) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकीत केलेला फोटो चिकटवावा. असेच आणखी ३ फोटो अर्जासोबत जोडावेत. उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात व मुळ प्रती कागदपत्रे तपासणी वेळी सादर कराव्यात. तसेच अर्जासोबत स्वत:चा पत्ता लिहिलेला २५X१० सेमी आकाराचा योग्य त्या किंमतीचे पोस्टाचे तिकीट लावलेला एक लिफाफा जोडणे आवश्यक ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST OF ___________ and CATEGORY ___________ “ असे लिहावे. शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचारी/महामंडळातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत व ‘ना हरकत प्रमाणपत्र’ अर्जासोबत जोडावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Chief Quality Assurance Establishment (Naval Stores), DQAN Complex, 8th Floor, Naval Dockyard, Tiger Gate Mumbai- 400023
अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – ०६ जुलै २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *