बृहन्मुंबई महानगरपालिका : परिचारीका प्रवेश २०२४ - govtjobsu.com

बृहन्मुंबई महानगरपालिका : परिचारीका प्रवेश २०२४

omkar
4 Min Read

बृहन्मुंबई महानगरपालिका : परिचारीका अभ्यासक्रमांसाठी १२ वी विज्ञान उत्तीर्ण पुरुष व महिला उमेदवारांकडून दि.२० जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

अभ्यासक्रमाचे नाव – सहाय्यकारी परिचारीका प्रसविका अभ्यासक्रम

प्रवेश संख्या – ३५० (ओपन ९८, एसईबीसी ३५, ईडब्ल्युएस ३५, ओबीसी ६७, अजा ४५, अज २४, विजाअ ११, भजब ९, भजक १२, भजड ७, विमाप्र ७)

पात्रता – उमेदवार ४० टक्के गुणांनी १२ वी (बायोलॉजी/ केमिस्ट्री/फिजिक्स विषयासह) उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – दि. ३१ जुलै २०२४ रोजी उमेदवाराचे वय १७ ते ३५ वर्षांपर्यंत असावे. म्हणजेच उमेदवारांचा जन्म ०१ ऑगस्ट १९८९ ते ३१ जुलै २००७ दोन्ही दिवस धरुन दरम्यान झालेला असावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविले जाईल. समुपदेशनासाठी निवड झालेल्या उमेदवारांना स्वखर्चाने मुळ प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्जाची प्रत अर्ज शुल्क पावतीसहीत हजर रहावे लागेल. समुपदेशन करीता पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व समुपदेशनासाठी हजर राहणेकरीता उमेदवारांना कुठलाही वैयक्तीक पत्रव्यवहार केला जाणार नाही.

शारीरिक पात्रता पडताळणी व कागदपत्रे तपासणी केंद्र – समुपदेशन लो. टि. म. स. रुग्णालय, शीव, मुंबई – ४०००२२

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मुळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले मुळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन उमेदवारांना ₹६६१/- व  मागासवर्गीय – उमेदवारांसाठी ₹४४१/- अशी परीक्षा फी अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड /डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. जे उमेदवार दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करु इच्छितात अशा उमेदवारांना दोन्ही अभ्यासक्रमांसाठी असणारी परीक्षा फी एकत्रित भरावी लागेल. अर्ज कसा करावा उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी portal.mcgm.gov.in या वेबसाईटवरून दि. २० जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक ४) जातीचा दाखला ५) क्रिडा प्रमाणपत्रे उमेदवारांनी शारीरिक पात्रता पडताळणी व कागदपत्रे तपासणीवेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा १० वीचे प्रमाणपत्र, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी, भजब, भजक, भजड, विजाअ, विमाप्र उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, असल्यास ड्रायव्हिंग लायसन्स, असल्यास एन.सी.सी प्रमाणपत्र, असल्यास नागरी संरक्षण दलाचे प्रमापत्र, असल्यास होमगार्ड प्रशिक्षण प्रमाणपत्र व वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिलेले विहित नमुन्यातील वैद्यकिय प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. अधिक माहितीसाठी portal.mcgm.gov.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – २० जून २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *