DRDO, चंदीगड : ज्युनिअर रिसर्च फेलो पदांसाठी उच्च पदवी + नेट/गेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना दि. १९ जून २०२४ रोजी विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीस बोलवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलोज् (कॉम्प्युटर सायन्स),
पदसंख्या – ३
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत एम.एस्सी बीई/बीटेक (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजि.) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार NET/ GATE परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एमई/ एमटेक (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजि.) उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलोज् (फिजिक्स),
पदसंख्या – ०२
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत उच्च पदवी (फिजिक्स विषयासह) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार NET/GATE परीक्षा उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – ज्युनिअर रिसर्च फेलोज् (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन),
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणीत एम.एस्सी बीई / बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार NET/GATE परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार प्रथम श्रेणीत एमई/एमटेक (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षांपर्यंत सवलत.
विद्यावेतन – उमेदवारांना ₹३७०००/- द.म. असे विद्यावेतन अदा केले जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते अदा केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्येत बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रतींसह दिलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ९.०० वाजता मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.,
मुलाखत दिनांक – पद क्र. १ ते ३ साठी – १९ जून २०२४,
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रतींसह मुलाखतीस उपस्थित राहावे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रके व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला (जन्म दाखला/ १० वी प्रमाणपत्र) ३) नेट/गेट स्कोअर कार्ड ४) जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ५) ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र ६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र ७) अनुभव असल्यास तसा दाखला ८) दिव्यांग(अपंग) असल्यास तसे प्रमाणपत्र ९) शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचारी असल्यास ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र १०) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी अलिकडील काळातील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवावा. असाच आणखी एक फोटो सोबत घेऊन जाणे आवश्यक. उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित केलेल्या प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. मुलाखतीचे ठिकाण. – The Director, Defence Geoinformatics Research Establishment (DGRE), Him Parisar, Sector 37 A, Chandigarh (UT)
मुलाखतीचा दिनांक व वेळ – दि. १९ जून २०२४ सकाळी ८.३० वाजता.
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *