बॉम्बे हायकोर्ट, औरंगाबाद : ट्रान्सलेटर्स २०२४ - govtjobsu.com

बॉम्बे हायकोर्ट, औरंगाबाद : ट्रान्सलेटर्स २०२४

omkar
4 Min Read

बॉम्बे हायकोर्ट, औरंगाबाद बेंच : ज्युनिअर ट्रान्सलेटर ॲण्ड इंटरप्रिटर पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २९ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – ज्युनिअर ट्रान्सलेटर ॲण्ड इंटरप्रिटर

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार पदवी (इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती यापैकी एकाविषयातील) उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवार संगणक हाताळणी/वापराबाबतचे नमुद केलेले महाराष्ट्र/गोवा राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ यांचे अधिकृत MS-CIT किंवा DOEACC सोसायटीच्या CCC किंवा O/A/B/C स्तरापैकी कोणतीही एक परीक्षा/समतुल्य प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण असावा. उमेदवारास इंग्रजी आणि मराठी, हिंदी, गुजराती, कोकणी यापैकी कोणत्याही दोन भाषांचे ज्ञान असणे आवश्यक. उमेदवार कायदा पदवी उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा – दि. १० मे २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. विभागीय / शासकिय कर्मचाऱ्यांना उच्चतम वयोमर्यादेची अट लागू नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु४९१००-१५५८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणी शिवाय उमेदवारांना सर्व सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.

सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा १०० गुणांची असेल. यामध्ये इंग्रजी व्याकरण (३० गुण), निबंधलेखन (२० गुण), पत्रलेखन (१० गुण) आणि इंग्रजीमधून हिंदी/मराठी/ गुजराती/ कोकणी या भाषांपैकी कोणत्याही दोन भाषोमध्ये भाषांतर करणे (४० गुण) या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी किमान ५०% गुण मिळविणे आवश्यक. यामधील पात्र उमेदवारांची २० गुणांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकिय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत ई- मेल/एस.एम.एस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करून घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र/पॅनकार्ड इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹२००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https:// bombayhighcourt.nic.in/ या वेबसाईटवरून दि. २९ मे २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करावा. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, एस.ई.बी.सी, ओबीसी, भजेब, भजक, भजड, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, डोमेसाईल प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त असल्यास अशंकालीन तसे प्रमाणपत्र, भूकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, उमेदवार असल्यासे तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, दोन प्रतिष्ठीत व्यक्तींनी दिलेले विहित नमुन्यातील चारित्र्याचे प्रमाणपत्र, विवाहीत महिला असल्यास गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in/ ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – २९ मे २०२४ सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *