ONGC: मेंगलोर रिफायनरी : एक्झीक्युटीव्हज् पदांसाठी गेट परीक्षा २०२३ साठी बसलेल्या उमेदवारांकडून दि. १० फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
१) पदाचे नाव – असिस्टंट इंजि. / असिस्टंट एक्झीक्युटीव्ह (केमिकल)
पदसंख्या – १५ (ओपन ८, ईडब्ल्युएस १, ओबीसी ३, अजा १, अज २) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार ६०% गुणांनी बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (केमिकल इंजि./केमिकल टेक्नॉलॉजी/पेट्रोकेमिकल इंजि./ पेट्रोकेमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा तसेच गेट परीक्षा २०२३ उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – असिस्टंट इंजि./असिस्टंट एक्झीक्युटीव्ह (मेकॅनिकल)
पदसंख्या – ८ (ओबीसी ४, अजा ३, अज १) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार ६०% गुणांनी बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा तसेच गेट परीक्षा २०२३ उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – असिस्टंट इंजि./असिस्टंट एक्झीक्युटीव्ह (इलेक्ट्रीकल)
पदसंख्या – ३ (ओबीसी १, अजा १, अज १) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार ६०% गुणांनी बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा तसेच गेट परीक्षा २०२३ उत्तीर्ण असावा.
४) पदाचे नाव – असिस्टंट इंजि./असिस्टंट एक्झीक्युटीव्ह (कॉम्प्युटर सायन्स)
पदसंख्या – ३ (ओबीसी १, अजा १, अज १) पैकी कर्णबधीर १
पात्रता – उमेदवार ६० उमेदवार ६० % गुणांनी बीई/बीटेक/बी.एस्सी इंजि. (कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजि./कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी/ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/आर्टीफिशिअल इंटेलिजन्स/मशिन लर्निंग/डाटा सायन्स/सायबर सिक्युरीटी/इंटरनेट ऑफ थिंग्स) उत्तीर्ण असावा तसेच गेट परीक्षा २०२३ उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय २७ वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा / अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. औपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत. माजी सैनिकांना वयात ५ वर्षे सवलत. विभागीय कर्मचाऱ्यांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ५०,०००-१,६०,०००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना सर्व, सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवार संबंधित विषयामधून गेट २०२३ परीक्षेस बसलेला असावा. ३) उमेदवारांचे वय, पात्रता इ. दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता, गेट परीक्षा २०२३ मध्ये मिळालेले गुण आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची गेट २०२३ मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यामधील उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची गेट २०२३ मध्ये मिळालेले गुण (६० गुण), शैक्षणीक पात्रतेनुसार गुण (२५ गुण) आणि मुलाखतीमध्ये मिळालेले गुण (१५ गुण) अशी गुणविभागणी करुन अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यामधील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी ₹१००+ जीएसटी /- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकींग/क्रेडीटकार्ड/डेबीटकार्डद्वारे भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. तसेच उमेदवाराकडे गेट परीक्षेच्या ॲडमिट कार्डवरील रजिस्ट्रेशन नंबर व ॲप्लीकेशन नंबर असणे आवश्यक. उमेदवारांनी www.mrpl.co.in या वेबसाईटवरून दि. १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. गेट २०२३ फॉर्ममध्ये अपलोड केल्याप्रमाणे फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा व अर्जाची प्रिंटाऊट काढावी. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रिंटाऊट किंवा कोणतीही कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) गेट २०२३ रजिस्टेशन नंबर २) गेट २०२३ फॉर्ममध्ये अपलोड केल्याप्रमाणे फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) जातीचा दाखला ४) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ५) अपंग असल्यास तसा दाखला
उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. १० फेब्रुवारी – २०२४
****************************************************************************************************************************************************************************************