बँक ऑफ बरोडा: मॅनेजर सिक्युरीटी पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. १० फेब्रुवारी २०२४ फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित असून सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
पदाचे नाव – मॅनेजर सिक्युरीटी (एमएमजी/एस-11),
पदसंख्या – ३८ (ओपन १८, ईडब्ल्युएस ३, ओबीसी १०, अजा ५, अज २)
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. तसेच आर्मीमधील ज्युनिअर कमिशन्ड ऑफीसर किंवा नेव्ही / एअरफोर्स / पॅरा मिलीटरी फोर्स मधील समतुल्य पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि.०१ जानेवारी २०२४ रोजी उमेदवाराचे वय २५ ते ३५ या दरम्यान असावे. अनु.जाती/जमाती ५ वर्षे, ओबीसी ३ वर्षे, अपंग – ओपन १० वर्षे, ओबीसी १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे वयात सवलत. माजी सैनिक/ECO/SSCO यांना वयामध्ये ५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹४८१७०-६९८१०/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव इ. दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल. मुलाखतीसाठी येणाऱ्या अजा/अज उमेदवारांना नियमाप्रमाणे प्रवासखर्च दिला जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावीत. ऑनलाईन परीक्षेच्यावेळी उमेदवारांनी प्रवेशपत्रासोबत, फोटो असलेले एक ओळखपत्र (पॅनकार्ड/ रेशनकार्ड/आधारकार्ड/पासपोर्ट इ.) व त्याची साक्षांकीत प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
• परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹६०० तर अजा/ अज/महिला उमेदवारांना ₹१०० अशी असून ती नेटबँकींग/ क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे भरणे आवश्यक
• अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईटवरून दि. १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो) व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही, विहित नमुन्यातील डिक्लरेशन स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ईरिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकग्राऊंड असलेला फोटो (प्राधान्याने पांढरी बॅकराऊंड असलेला फोटो) व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) असल्यास अनुभव प्रमाणपत्र ४) आधारकार्ड
उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी इन्कम ॲण्ड ॲसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय / निमशासकिय /विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. १० फेब्रुवारी २०२४