इंडियन नेव्ही (अग्निवीर) : MR : 10 वी २०२४ - govtjobsu.com

इंडियन नेव्ही (अग्निवीर) : MR : 10 वी २०२४

omkar
6 Min Read

इंडियन नेव्ही (अग्निवीर) : MATRIC RECRUITMENT (MR) पदांसाठी १० वी उत्तीर्ण अविवाहित पुरूष व महिला उमेदवारांकडून दि. ५ जून २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

कोर्सची सुरुवात – जून २०२४

१) पदाचे नांव – स्टीवॉर्ड (अविवाहीत पुरुष व महिला)

२) पदाचे नांव – कुक (Chef) (अविवाहीत पुरुष व महिला)

३) पदाचे नांव – हायजिनिस्ट (Hygienis) (अविवाहीत पुरुष व महिला )

 

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

शारीरिक पात्रता – पुरुष उमेदवार उंची : किमान १५७ सें.मी. महिला उमेदवार उंची : किमान १५२ सें.मी. वजन : उंचीच्या प्रमाणात. छाती : कमीत कमी ५ सेंमी फुगणे आवश्यक. दृष्टी : चष्म्याशिवाय चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/९ तर चष्म्यासह चांगला डोळा ६/६ तर खराब डोळा ६/६. तिरळेपणा, रातआंधळेपणा, रंगांधळेपणा, बहीरेपणा तसेच गुडघ्याला गुडघे टेकणे, फुगलेल्या शिरा इ. दोष असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नयेत.

वयोमर्यादा – उमेदवारांचा जन्म १ नोव्हेंबर २००३ ते ३० एप्रिल २००७ (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा.

वेतनश्रेणी – प्रशिक्षण काळात उमेदवारांना पहिल्यावर्षी ₹ ३०,०००/- द. म, दुसऱ्या वर्षी ₹३३,०००/- द. म, तिसऱ्यावर्षी ₹३६,५००/- द. म तर चौथ्या वर्षी ₹४०,०००/ – द. म असे वेतन अदा केले जाईल. वेतनश्रेणीशिवाय रेशन, कपडे, राहण्याची सोय, ३० दिवसांची वार्षिक रजा, अजारी रजा स्वत:साठी विनामूल्य वैद्यकीय सेवा, सवलतीच्या दरात प्रवास, ४८ लाखांचा विमा इ. सोयी व सवलती दिल्या जातील. ४ वर्षांच्या सेवेनंतर उमेदवारांना १०.४ लाख इतका सेवा निधी पॅकेज दिले जाईल. याशिवाय सेवेत असताना मृत्यु झाल्यास त्या रु. ४४ लाखांचा निधी प्रदान केला जाईल. याशिवाय सेवेत अपंगत्व आल्यास त्यास त्याप्रमाणात निधी दिला जाईल.

सेवा कालावधी – उमेदवारांची नेमणूक ०४ वर्षांची असेल. ४ वर्षाचा सेवा कालावधी पूर्ण केल्या नंतर उमेदवारास नेव्हीमार्फत स्कील प्रमाणपत्र अदा केले जाईल. ज्याच्या आधारावर उमेदवारास इतर नोकरी साठी प्रयत्न करताना प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही स्थितीत उमेदवारास निवृत्त सैनिकाचा दर्जा दिला जाणार नाही.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैद्यकीय चाचणी याद्वारे केली जाईल. प्रथम उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ५० प्रश्नांची व १ तास कालावधीची असेल. यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामान्यज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. परीक्षेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असेल तसेच परीक्षेचा स्तर – १० वी समान असेल. ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील. उमेदवारांनी प्रत्येक विषयात स्वतंत्ररित्या उत्तीर्ण होणे आवश्यक. ऑनलाईन परीक्षेचा निकाल अदांजे ३० दिवसांनी वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. यामध्ये पुरुष उमेदवार – १.६ कि.मी. धाव ६.३० मिनिटात पूर्ण करणे, २० उठक बैठक आणि १२ पुशअप्स महिला उमेदवार – १.६ कि.मी. धाव ०८ मिनिटात पूर्ण करणे, १५ उठक बैठक, १० बेंट नी सीटअप्स अशा चाचण्यांचा समावेश असेल. यामधील पात्र उमेदवारांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी घेतली जाईल. प्राथमिक वैद्यकिय चाचणीमध्ये अपात्र ठरलेले उमेदवार २१ दिवसाच्या आत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पुन्हा आपली वैद्यकीय चाचणी करुन घेऊ शकतात. प्राथमिक वैद्यकिय चाचणीमधील पात्र उमेदवारांची यादी वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. यामधील • उमेदवारांनी अंतिम वैद्यकीय चाचणीच्यावेळी प्रवेशपत्रासोबत संबंधित जिल्ह्याचा पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म सोबत घेऊन जाणे आवश्यक. पोलीस व्हेरीफिकेशन फॉर्म उमेदवारांनी वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. अंतिम वैद्यकिय चाचणीमध्ये वैद्यकीयदृष्ट्या तात्पुरते नाकारलेले उमेदवार २१ दिवसाच्या आत मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पुन्हा आपली वैद्यकीय चाचणी करुन घेऊ शकतात. मात्र त्यासाठी शासकीय कोषागारात मिलिटरी रिसीव्हेबल ऑर्डर (MRO) द्वारे ₹४० भरावे लागतील. ही चाचणी INS चिल्का येथे होईल. अंतिम वैद्यकिय चाचणीमधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत ई-मेल आणि एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ तसेच स्वसाक्षांकित प्रती, ऑनलाईन अर्जात अपलोड केल्याप्रमाणे फोटो व फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹५५० + १८% जीएसटी अशी असून ती नेटबँकिंग/क्रेडीट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

प्रशिक्षण – प्रशिक्षण जून २०२४ मध्ये सुरु होईल. प्रथम आयएनएस चिल्का (ओरिसा) येथे १५ आठवड्यांचे पायाभूत प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्ण होताच उमेदवारास ट्रेड प्रदान करण्यात येतील. प्रदान केलेल्या ट्रेडप्रमाणे उमेदवारांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण काळात अभ्यासाचे साहित्य, युनिफॉर्म, राहणे, जेवण इ. विनामूल्य दिले जाईल.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.joinindiannavy.gov.in या वेबसाईटवरुन दि.१३ मे २०२४ ते ५ जून २०२४ पर्यंत अर्ज करावेत. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड स्वतःजवळ नोंद करून ठेवावा. त्यांनतर अर्जामध्ये आवश्यक ती माहीती भरावी. फिक्या रंगाची बॅकराऊंड असलेला फोटो, काळ्या शाईच्या पेनाने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. त्यानंतर अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फिक्या रंगाची बॅकराऊंड असलेला फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) दहावीचे गुणपत्र व प्रमाणपत्र ३) १२ वी चे गुणपत्रक ४) आधारकार्ड ५) डोमेसाईल प्रमाणपत्र ६) एनसीसी प्रमाणपत्र (असल्यास) उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊटसोबत वरील प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जातीचा दाखला इ. प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. अधिक माहितीसाठी व निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी उमेदवारांनी www.joinindiannavy.gov.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी – दि. १३ मे २०२४ ते ५ जून २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *